🔥हाच तो गोपाल कशी प्रसाद बोरले एक नंबर चा खंडणी बहाद्दर🔥हाच तो शशांक गोपाल बोरले ज्याने प्रतिष्ठित व्यवसायिक दत्ता सेंगर यांना अवधुत वाडी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याची दिली धमकी
🔥अल्पवयीन मुलाला पुढे करून प्रतिष्ठित व्यावसायिकाला ‘पोक्सो’त अडकवण्याचा कुटील डाव उघड!
🔥व्यावसायिक वैमनस्यातून रचले अपहरण व बदनामीचे कारस्थान
यवतमाळ -/ व्यावसायिक स्पर्धेतून आणि वैयक्तिक प्रतिष्ठेच्या ईर्षेतून एका निष्पाप व प्रतिष्ठित व्यावसायिकाला थेट ‘पोक्सो’ सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवून उद्ध्वस्त करण्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ शहरात उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन शाळकरी मुलाचा वापर करून शहर पोलीस ठाण्यात बनावट तक्रार दाखल करवून बदनामीचे पद्धतशीर षडयंत्र रचण्यात आले होते. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात घटनेच्या दिवशी संशयित वाहन आणि संबंधित व्यक्ती जिल्ह्यातच उपस्थित नसल्याचे तांत्रिक पुराव्यांवरून सिद्ध झाले असून, या प्रकरणाच्या मुळाशी असलेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक बाप-लेक आणि एका वकिलाचा खरा चेहरा चव्हाट्यावर आला आहे.
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या बनावट तक्रारीनुसार, २३ जून रोजी दारव्हा रोड परिसरात फिर्यादी शाळकरी मुलाचा एका व्यक्तीला चुकून धक्का लागला. यावरून संबंधित व्यक्तीने मुलाला व त्याच्या पालकांना अश्लील शिवीगाळ केली आणि पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून (क्रमांक MH-29-CR-4141) निघून गेला, असा दावा करण्यात आला.
त्यानंतर कथेचा दुसरा भाग रचत ९ जुलै रोजी तीच इनोव्हा गाडी पुन्हा रस्त्यात आडवी लावून विद्यार्थ्याला अडवण्यात आल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर मुलाच्या खासगी अवयवाला पकडून त्याला बळजबरीने गाडीत कोंबण्याचा प्रयत्न झाला आणि “याला तिकडे नेऊन मारून टाकू” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.
अल्पवयीन बालकाचा विनयभंग व अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे दाखवून शहर पोलिसांनी कसलीही प्राथमिक पडताळणी न करता इनोव्हा मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणाऱ्या ‘पोक्सो’ कायद्याच्या कलम ८ अंतर्गत थेट एफआयआर (FIR) नोंदवला. कायदेशीर तरतुदींचा आधार घेत एका प्रतिष्ठित व्यक्तीचे सामाजिक जीवन क्षणार्धात उद्ध्वस्त करण्याची संपूर्ण तयारी या माध्यमातून करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला असता पोलिसांना चक्रावून टाकणारे वास्तव समोर आले वाहनाची अनुपस्थिती: ज्या MH-29-CR-4141 क्रमांकाच्या इनोव्हा गाडीवर आरोप करण्यात आले, ती गाडी आणि मूळ वाहनमालक कथित घटनेच्या दोन्ही तारखांना (२३ जून व ९ जुलै) यवतमाळ शहरात अथवा जिल्ह्यात हजरच नव्हते.
मोबाइल लोकेशन व सीसीटीव्ही तांत्रिक पुरावे, टोल नाक्यांचे फुटेज आणि मोबाइल लोकेशनच्या तपासणीत सदर व्यक्ती शेकडो किलोमीटर दूर असल्याचे निष्पन्न झाले.अल्पवयीन मुलाचा कबुलीजबाब खाक्या दाखवताच तक्रारदार मुलाने हे संपूर्ण कथानक स्वतः रचलेले नसून, काही हितसंबंधी व्यक्तींच्या सांगण्यावरून पोलिसांत खोटी तक्रार दिल्याचे समोर आणले.
या प्रकरणाच्या मुळाशी जाताच स्थानिक रिअल इस्टेट क्षेत्रात दहशत निर्माण करू पाहणारे पिता-पुत्र आणि त्यांना कायद्याचा गैरवापर करून देणारा एक तथाकथित वकील यांचा सहभाग उघड झाला आहे.संबंधित नामांकित व्यावसायिकाशी जमिनीच्या व्यवहारातून व व्यावसायिक स्पर्धेतून या टोळीचा तीव्र वाद सुरू होता. सरळ मार्गाने पराभव दिसत असल्याने या बाप-लेकांनी निष्पाप अल्पवयीन मुलाला हाताशी धरले आणि त्याला पुढे करून ‘पोक्सो’चा बडगा उगारला. यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक प्रतिष्ठित नागरिकांना खोट्या फौजदारी तक्रारींमध्ये अडकवून, बदनामीची भीती दाखवून खंडणी उकळण्याचे आणि जमिनी हडपण्याचे उद्योग या टोळीने केल्याचे आता बोलले जात आहे.
बालकांच्या संरक्षणासाठी बनवण्यात आलेल्या अत्यंत संवेदनशील व कडक कायद्याचा उपयोग वैयक्तिक सूड उगवण्यासाठी आणि खंडणीखोरीसाठी केला जात असल्याचा हा प्रकार अत्यंत घातक व संतापजनक आहे. प्राथमिक सत्यता न तपासता कोणाच्या दबावाखाली येऊन शहर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवला, असा रोकठोक सवाल आता उपस्थित होत आहे.
पोलीस प्रशासनाने केवळ गुन्हा खोटा ठरवून न थांबता, एका निष्पाप नागरिकाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचणाऱ्या त्या भूमाफिया बाप-लेकावर आणि त्यांना कायद्याचा विकृत सल्ला देणाऱ्या वकिलाविरुद्ध फौजदारी कट फसवणूक आणि खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तत्काळ कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आता जोर धरत आहे.(क्रमशः)