आमदार दादाराव केचे यांना बांधावर दिले निवेदन , नुकसान गस्त भागाची केली पाहणी
Byसाहसिक न्युज 24
रसुलाबांद/ संदीप रघाटाटे: रसुलाबाद परिसरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेताची नासाडी झाली आहे तसेच पिकांची व शेतीची खूप नुकसान झाले आहे झालेल्या पावसात शेती खरडून गेली होती पिके खरडून गेले शेतातील बांध फुटला , आणि इतरही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते
त्या नुकसानीची दखल घेत आर्वी विधान सभा चे आमदार दादारावजी केचे यांनी शेतकऱ्यांनच्या शेतावर जाऊन झालेल्या नुकसान ची पाहणी केली आहे यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना बांधावर निवेदन देत आपण नुकसान झालेल्या ना मदतीचे आश्वासन देण्यात आहे
यावेळी उपविभागीय कुषी अधिकारी सतीश सांगळे , तालुका कृषी अधिकारी सुप्रिया वाळवड , कुषी मंडळ अधिकारी जीवन ढगे , कुषी सह्ययक निलेश गंधरे , तलाठी गौरव भोयर आदी अधिकारी पाहणी दरम्यान उपस्थित होते
यावेळी रसुलाबाद मधील झालेल्या नुकसानीची सविस्तर पणे माहीती आमदार दादारावजी केचे यांनी घेतली
यावेळी रसुलाबाद चे सरपंच राजेश सावरकर , ड्रॉ लोकेंद्र दाभिरे , राजू मानकर , विजय गुल्हाणे , प्रजवल काडलकर, मंगेश सावरकर , मनोहर गवारले , मोहन गवारले , गजानन काळपांडे , याच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते