आमदार साहेब वाकान येथील पुलाच्या बांधकामाचे आश्वासन कधी पुर्ण होणार….?

0

🔥हेच ते वाकान आमदार साहेब येथील पुलाच्या बांधकामाचे आश्वासन कधी पुर्ण होणार.

महागांव -/ तालुक्यातील व पुसद मतदार संघातील अतीशय दुर्गम व डोंगराळ भागात दुधगाळ नाल्याच्या काठी वसलेले हे छोटेसे गाव वाकान या गावची विकासाच्या संदर्भात भुमिका बघीतल्यास अतीशय गंभीर आणी दयनीय अवस्था या वाकान गावची आहे पावासाळा सुरू झाल्यावर या गावचा एकही नागरीक रात्रीच्या वेळेस शांतीची झोप घेत नाही कारण गावालगत असलेल्या दुधाळ नाल्याला केंव्हा महापुर येईल आणि रात्रीच्या झोपेत येथील नागरीकांचे स्वप्न केंव्हा क्षणभंगुर होईल याचा काही नेम नाही वाकान लगत दोन्ही साईडने नदी नाले असल्याने केवळ एकच मार्ग नागरिकांना आपला जिव वाचविण्यासाठी सोईस्कर पडतो तो म्हणजे नाल्याच्या पलीकडे वसलेल्या वस्तीत आणि त्यासाठी आवश्यकता आहे पुलाची मा.राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब हे अनेक वेळी वाकान येथे येऊन व भेटी देऊन गावची परिस्थिती पाहुण गेले व वाकान येथील दुधगाळ नाल्याला पुल बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र आजपर्यंतही या आश्वासनाची पुर्तता झाली नाही आजही वाकान हे गांव नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली बाल्यकिला म्हणूनच येथील नागरिक काम करीत असुन येथे केवळ नाईक घरान्याचेच अधिकार आहे मात्र एक छोटेसे आश्वासन पुर्ण होत नसल्याने येथील महिला पुरुषामधुन नाराजीचे सुर छेडले जात आहे विकासाच्या संदर्भात वाकान हे गांव फारच मागे राहिले आहे उदा: येथे स्मशानभूमी सेड नाही, येथे व्याम शाळा नाही, येथे जिल्हा परिषद नवीन शाळेचे बांधकाम नाही, येथे दोन्ही साडीच्या नाल्याला पुल नाही, येथील एकाही मंदीराला सभामंडप नाही, रस्त्यावर कमानी गेट नाही, येथील सर्व रस्ते चिखलमय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र नाही, एसटी बसेसची व्यवस्था नाही अशा अनेक समस्यांनी वाकान हे गांव घेरले आहे मा.राज्यमंत्री महोदय आपण स्वतःहा वेळेमधील वेळ काढून येथील परिस्तिथी पाहून जावे तेव्हा आपल्या लक्षात येईल की एका छोट्याशा गावची परिस्थिती कशी आहे या गावापासून विकास नावाचा कीडा कोसो दुर आहे मा.राज्यमंत्री महोदयास एकच विनंती आहे जसे आपण आपल्या मतदारसंघातील बाकी गावांमध्ये निधी देऊन भुमीपुजन करीत आहेत तसेच एखादा निधी वाकान येथील विकासकामांसाठी देउन आपण दिलेले आश्वासन पुर्ण करावे असे वाकान येथील नागरिकांमधून बोलल्या जात आहे.

कय्युम पठाण साहसिक News-/24 महागांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!