आष्टा हे संत योगी भिकाराम महाराज आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे..
वर्धा -/ संत योगी भिकाजी महाराज देवस्थानला तीर्थक्षेत्र ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.ग्रामविकास विभागाने शासन निर्णय क्रमांक २०११/प्र.क्र. ६७१ नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत हा दर्जा बहाल केला आहे.ग्रामीण तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याकरिता संदर्भीय शासन
नियमानुसार संत योगी भिकाराम महाराज देवस्थानला आता ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.आष्टा येथील संत योगी भिकाराम महाराज हे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे.संत भिकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी विदर्भातील अनेक भाविक येतात.अनेक दिवसांपासून संत योगी भिकाराम महाराज यांच्या कर्मभूमीला
तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा,अशी भक्तांची मागणी होती.धामणगावचे आमदार प्रताप अडसड यांनी ही मागणी शासन दरबारी रेटून धरली. आता मागणी मंजूर करण्यात आली असून लवकरच या कामाची सुरुवात होणार असल्याचे मंदिर देवस्थानकडून कळविण्यात आले आहे.मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हंसराज जाधव, प्रीतम राऊत,उमेश चरपे,अशोक राऊत,दीपचंद भेंडे,यांनी आमदार अडसर यांचे आभार मानले आहेत.