उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय भेट वस्तू वाटप व वृक्षारोपण करण्यात आले…

0

देवळी -/ श्रध्येय माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या वाढदिवस निमित्ताने भगवा सप्ताह अभिष्टचिंतन सोहळ्यास सुरवात.तसेच शिवसेना नेते कामगार सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अरविंद सावन्त,तसेच.अरविंद नेरकर पश्चिम विदर्भ समन्वयक,यांच्या सूचनेनुसार,वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख निलेश धुमाळ साहेब,विधानसभा सभा संपर्क प्रमुख भालचंद्र देवरुखकर,रुपेश कांबळे,यांच्या मार्गदर्शनाखाली, वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे यांच्या नेतृत्वात देवळी नगर परिषद शाळा तसेच उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तसेच वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले.विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आपापल्या क्षेत्रात जिल्हा परिषद शाळेंत शालेय साहित्य वितरण करणार आहे आज २७ जुलै रोजी भगवा सप्ताह अंतर्गत वितरनाची सुरवात करण्यात आली आहे शिवसेनेचे ब्रीद वाक्य आहे अंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि उद्धव साहेबांचे ही संदेश होते कि त्यांच्या वाढदिवस दुसऱ्यांची मदत करून साजरा झाला पाहिजे तेच अनुसरून हा उपक्रम शिवसेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने येत्या आठवड्यात राबवण्यात येणार आहे.आज कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख उपस्थितत वर्धा जिल्हा संघटक भारत चोधरी, शाळेच्या मुख्यध्यापिका भगत मॅडम,जिल्हा समन्वयक पंकज झोरे,उपजिल्हा प्रमुख रमेश कडू, देवळी शहर प्रमुख मारोती दरणे, उपतालुका प्रमुख अविनाश इंगोले, देवळी शहर संघटक नितेश भानारकर यांच्या उपस्तितीत पार पडला.

सागर झोरे साहसिक news -/24 देवळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!