कमरेला सूरा अन् बसस्थानकावर रंगदारी..! दांडक्याचा प्रसाद देत पोलिसांनी घेतलं ताब्यात…

0

 सेलू -/ येथील बसस्थानक परिसरात रंगदारी करणाऱ्या मजनूला पोलिसांनी प्रसाद देत ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.आदित्य सुरेश कापटे (वय १९) वर्ष रा. धामणगाव असे त्या रंगदारी करणाऱ्या मजनूचे नाव आहे.येथील बसस्थानक परिसरात शाळा कॉलेजच्या वेळात टारगट युवकांसह मजनूंचा मोठा गोतावळा असतो.याठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये दिवसाआड राडा होणे, ही नित्याचीच बाब झाली आहे. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी देखील याठिकाणी गस्त वाढविली.येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास काही टारगट युवक एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या बेतात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका युवकाला ताब्यात घेतले.यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक धारदार लोखंडी चाकू खोसलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळाला. यावेळी पोलिसांनी त्याच्यासह त्याची वकीली करण्यासाठी आलेल्या एकास पार्श्वभाग सुजेपर्यंत चांगलेच फटके दिले.त्यामुळे या परिसरात मजनूगिरी आणि टवाळक्या करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या युवकांवर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, पोलीस हवालदार श्रावण ठाकरे, तुषार भुते, रत्नाकर कोकाटे यांनी केली.

सचिन धानकुटे साहसिक news -/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!