सिंदी (रेल्वे) -/येथील कुख्यात गुंड तथा अवैद्य दारू विक्रेता हरी घंगारे व त्याचा साथीदार नेहुल बेलखोडे यांना पोलीस अधीक्षक वर्धा अनुराग जैन यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे मात्र अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंदी शहरातील पिपरा रोडवर राहनारा हरी घंगारे वय 40 वर्षा हा त्याचा साथीदार नेहुल बेलखोडे वय 30 वर्ष याचेसह टोळी करून शहरालगतच्या नागपुर जिल्ह्यातुन देशी व विदेशी दारुची अवैद्यपणे वाहतुक करून सिंदी शहर तसेच परिसरात राजरोसपणे विक्री करीता होता. एवढेच नाही तर हरी घंगारे हा शहरात दादागिरी करून हातात चाकूसारखे शस्त्र घेऊन शिविगाळ करणे, जीवानिशी ठार मारण्याची धमकी देने तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करण्याचा सवयीचा होता. गुंड हरी घंगारे याने टोळी तयार करून कोणालाही नेहमी धमकावत होता. स्वतःचे वयक्तिक कामे करून घेणे, त्याचे काम ऐकले नाही तर मारहाण करणे अशा प्रकारे शहरात घंगारेची दहशत वाढत चालली होती. त्यामुळे त्याचे विरुद्ध कोणीही नागरिक पोलिसात तक्रार करीत नव्हते. त्याच्या या कृत्यामुळे शहरातील शांतता नेहमी भंग होत होती. त्यामुळे सण 2020 मध्ये उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्या आदेशाने हरी घंगारे याला एक वर्षासाठी तडीपार केले होते.
पोलीसांनी हरी घंगारे व नेहुल बेलखोडे यांच्यावर वारंवार कार्यवाही केली पंरतु कार्यवाहीचा त्याच्यावर व त्याचे साथीदारावर काहीच परिणाम पडत नसल्याने त्यांच्या गुन्हेगारी प्रवृतीवर सुधारना व्हावी म्हणून कलम 55 मपोका अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करुन पोलीस अधिक्षक साहेब वर्धा अनुराग जैन यांना सादर केला होता. हरी घंगारे याचेवर दारुबंदी कायद्या अंतर्गत पोलीस स्टेशन सिंदी येथे 15 गुन्हे नोंद आहे तसेच त्याचा साथीदार नेहुल बेलखोडे याचेवर 6 गुन्हे नोद आहे. सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांनी करून अहवाल पोलीस अधिक्षक वर्धा यांना सादर केला असता पोलीस अधिक्षक वर्धा यांनी सदर प्रकरणात हरी घंगारे नेमेश बेलखोडे या दोघांना दिनांक 04.6.2025 चे आदेशानुसार 2 वर्षासाठी वर्धा जिल्ह्याच्या सिमा हद्दीतून तडीपार केले आहे. सदर दोन्ही आरोपींना आदेश तामील झाला असुन दोन्ही ईसम गावात मिळुन आल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशन सिंदी येथे संपर्क करावा असे आवाहन ठाणेदार नरेंद्र निस्वादे यांनी केले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक नरेन्द्र निस्वादे ठाणेदार सिदी, प्रफुल डफ, काचन चालले, संजय भगत, उमेश खामनकार, नितीन नखाते यांनी केली आहे.