🔥कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी च्या उपशाखा सेलु येथे तिळ शेतमालाचे लिलाव शुभारंभ.
सेलु -/ येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये गुरुवार दि.१५ मे ला समितीचे सभापती मा. केसरीचंद बा. खंगारे यांच्या हस्ते संपन्न झाला असून तीळला सर्वाधिक भाव प्रती क्विंटल (८२२५) रुपये मिळाला आहे. सध्या आठवड्यातून एकच दिवस दर गुरुवार ला समिती च्या सेलू शाखेतील कापूस यार्ड मधील गोदाम क्रमांक ०१ मध्ये लिलावाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्षेत्रातील अनेक शेतकरीवर्ग तिळ शेतमालाचे उत्पादन घेत असून त्यांना शेतमाल विक्री करीता यवतमाळ येथील खाजगी बाजारात माल विक्री करीता जावे लागत होते. शेतकर्यांचा विनंती वर बाजार समितीचे सभापती केशरीचंद बा. खंगारे यांनी मागील वर्षी २०२४ पासून तिळ शेतमालाचे लिलावाची व्यवस्था करून शेतकर्यांच्या मालाला भाव मिळवुन देण्याचा प्रयत्न केला. या मुळे शेतकरीवर्ग समाधानी होते. यंदा तिळ शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकर्यांनी घेतलेला आहे.
सेलु येथील व्यापारी वर्गाने मागील वर्षी शेतमालाला योग्य भाव देऊन शेतकर्यांच्या मेहनतीला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. सदर तीळ लिलाव शुभारंभ प्रसंगी
सभापती केशरीचंद बा. खंगारे
उपसभापती प्रमोद जी आदमने , संचालक मंडळ विद्याधर वानखेडे , काशिनाथ लोणकर, गुणवंत कडू, श्याम वानखेडे, अनिल जिकार , सौ.रेनुकाताई कोटंबकर,संजय काकडे, संदीप वाणी ,धनराज गीरी ,वरून दप्तरी, सतीश धोपटे, मनोज तामगाडगे,शेख मुकतार,छबुताई पाटील, रानिताई देशमुख,गोपाल कोपरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी सचिव महेंद्र भांडारकर व कर्मचारी अमोल ढोक , किशोर राऊत , तीळ उत्पादक शेतकरी निळकंठ धोंगडी ,मोरेश्वर पाटील, गजानन राऊत ,गजानन झाडे, दिनेश कोवे अडते व्यापारी, हमाल मापारी प्रामुख्याने उपस्थित होते . समितीच्या संपूर्ण संचालक मंडळांनी तिळ उत्पादन करणार्या सर्व शेतकर्यांना जास्तीत जास्त संख्येने लिलावात शेतमाल घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.