कोटेश्वर च्या नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू.
मृतक आशिष कुंमरे
देवळी : तालुक्यातील कोटेश्वर येथे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे तेथेच बाजूला वर्धा नदी चे पात्र उत्तर वाहिनी म्हणून प्रसिद्ध आहे त्या नदीमध्ये भाविक भक्त आंघोळीसाठी नेहमीच दुरून दुरून येत असतात.मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मोक्षप्राप्तीसाठी त्यांच्या अस्थी येथे विसर्जिन करतात
आशिष भैयाजी कुमरे वय वर्ष २५ राहणार मलातपूर ता.देवळी हा दि. १९ सप्टेंबर रोजी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान वर्धा नदीचे पात्र कोटेश्वर येथे गावातील व्यक्तीच्या अस्थी विसर्जनासाठी आंघोळी करिता गेला असता,आंघोळ करताना पाण्यात बुडून मृत्यू पावला पाण्यात बुडाल्यानंतर त्याचा शोध घेतला असता परंतु त्याचा काही शोध लागला नाही नंतर दोन दिवसांनी २१ सप्टेंबर रोजी त्याचे शव वर्धा नदीच्या पात्रात सापडले देवळी पोलिसांनी त्याचा मृत्यूच्या मर्ग नोंदविला आहे पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर च्या नेतृत्वात देवळी पोलीस करीत आहे.सागर झोरे सहासिक न्यूज-24