खडकी गावाजवळ भीषण आग,सुदैवाने जीवित हानी टळली….. 

0

🔥पोलीस पाटलाच्या सतर्क तेने मोठा अनर्थ टाळला.

आष्टी शहीद -/ तालुक्यातील खडकी गावाजवळ भीषण आग लागली या आगीत गावाजवळ असलेल्या झोपडपट्टी भागात ही आग लागली असताना वेळीच अग्निशमन यंत्रणा पोहचल्याने मोठा अनर्थ टाळला.
सविस्तर असे
आष्टी तालुक्यातील वरदाळीचे ठिकाण म्हणून खडकी गावाची ओळख आहे. शेजारी नरसापूर हे गाव असून खडकी गावातील झोपड पट्टी भाग आहे. याच भागात  2 मे रोजी दुपारी अचानक आग लागली.पाहता पाहता ही आग झोपड पट्टी भागात आली या घटनेची माहिती पोलीस पाटील मंगेश नागपुरे यांना दिली गेली. पोलीस पाटलांनी तहसीलदार हंसा मोहने यांना फोनवरून माहिती दिली. तहसीलदार यांनी आष्टी नगरपंचायत येथील अग्निशमन विभागातील यंत्रनेला माहिती दिली. अग्निशमन यंत्र वेळेवर पोहचताच आग आटोक्यात आली. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टाळला. गावकरी यांनी अग्निशमन यंत्रनेचे कर्मचारी अनिल दोऱोकार, पोलीस पाटील मंगेश नागपुरे यांचे अभिनंदन गावकरी यांनी केले.

नरेश भार्गव साहसिक News-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!