खैरे कुणबी रणरागिणी मंच हिंगणघाट च्या वतीने श्रावण सोहळा संपन्न….

0

हिंगणघाट -/ खैरे कुणबी रणरागिणी मंच हिंगणघाटच्या वतीने दिनांक १ सप्टेंबर रोजी स्थानिक आर.एस.बिडकर महाविद्यालयाच्या सभागृहात श्रावण सोहळ्यानिमित्त पारंपरिक वेशभूषेत मंगळागौरी पूजन साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील Neet परिक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.श्रावण सोहळ्याच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रंजना थुटे , ॲड. प्रतिभा भानखेडे, डॉ.रश्मी खिळेकर , सौ.निता धोबे , अध्यक्षा कल्पना भोयर व सचिव सारिका ठोंबरे ह्या मंचावर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे संचालन श्वेता धोटे यांनी केले.वंदना भोयर यांनी आपल्या प्रास्ताविकातून रणरागिनी मंचाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिभा धोटे यांनी केले.सारिका भोयर यांनी उपस्थित महिलांना कहानीच्या माध्यमातून मंगळागौरीचे महत्त्व समजावून सांगितले .अनुश्री कोपरे, रिता पुसदेकर व सुनीता कोळसे यांनी उखाणे स्पर्धेचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रियंका पुलगमकर , प्रतिभा पडोळे व खैरे कुणबी रणरागिनी मंच सर्व सदस्यांनी सहकार्य केले. मंगळागौरी पूजन निमित्त रणरागिणी मंचच्या महिलांनी पारंपरिक वेष परिधान करून मंगळागौरीच्या गाण्यावर सामुहिक नृत्य सादर केले.खैरे कुणबी समाज मध्ये पहिल्यांदाच असा महिलांसाठी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला समाजातील महिलांकडून छान प्रतिसाद मिळाला व सर्व स्तरावरून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.पाहुण्यांचे हस्ते नीट परिक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थीनी कु.तन्वी सुनिल राऊत व आदिती प्रभाकर मुंगसे ह्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात शेकडोंनी रणरागिणी नी सहभाग घेतला. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ईकबाल पहेलवान साहसिक news-24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!