वर्धा /६ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यांत आला.मागील २ वर्षापासुन बोरगांव (मेघे), गिट्टी खदान येथील नागरीकांना सतत मनसे च्या वतीने अनेक निवेदन देण्यांत आले. परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही.त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडुन मोर्चा काढण्यांत आला.परंतु जिल्हाधिकारी यांनी भेट न दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यांत आले.आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर मनसे स्टाईल आंदोलन करण्यांत येईल असा इशारा देण्यांत आला.त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी खताळे यांनी निवेदन स्विकारले व दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक लावली, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष किशोर सरायकर, जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन अमृतकर, वाहतुक सेना राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे, जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे, शहर अध्यक्ष कन्हैय्या यादव, विद्यार्थी सेना शुभम दांडेकर,तालुका अध्यक्ष राजकुमार बावरी, तालुका उपाध्यक्ष धम्मदीप हिवरकर,जिवन पोहनकर यांनी आंदोलन मागे घेतले व मोर्चेकरांना सांगुन पुढील दिशा ठरवणार असे सांगितले.१५ दिवसात जर न्याय मिळाला नाही, तर मनसेतर्फ तिव्र आंदोलन करण्यांत येईल असे सांगण्यांत आले. या मोर्चाकरिता असंख्य बोरगांव गिट्टी खदान येथील पट्टधारक हजर होते. या मोर्चाचे आयोजन जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन अमृतकर, तालुका अध्यक्ष, राजकुमार बावरी यांनी केले होते. या मोर्चाला उपस्थित जयंत कातरकर, तालुका सचिव अनिकेत ठाकरे, उमेश अव्हाडकर, ओम क्षिरसागर, धनराज मुंजेवार, रामा दांडेकर, अशोक सिरसकर, प्रेम नागसेन, शंकर धुमराज, विठ्ठल नांदणे आदींची उपस्थित होते.