हिंगणघाट -/ इस्लाम धर्मात ज़क़ात एक महत्वपूर्ण कार्य आहे. प्रत्येक सम्पन्न मुस्लिम व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचा अडीच टक्के हिस्सा गरीब व गरजूंना देणे कर्तव्य आहे.
ज़क़ात च्या या रकमेतून नातेवाईक , निकटवर्तीय , गरजू , निराधार कुटुंबातील गरजू मुलांना देणे आवश्यक आहे.
मुस्लिम समाजातील आर्थिक दुर्बल घटक मधील जी मुले उच्च शिक्षन घेतात परंतु त्यांची आर्थिक स्थति चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना ज़क़ात फाउंडेशन आर्थिक सहाय्य करीत आहे.
ज़क़ात फाउंडेशन मल्टीपर्पज़ सोसायटी ची स्थापना ११ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आली. यात अध्यक्ष फ़िरोज़ खान, सचिव प्रा.फारिश अली, उपाध्यक्ष शाकिर खान पठान, कोषाध्यक्ष एडवोकेट मुबारक मलनस, सदस्य असद खान, मुनाफ कुरैशी, एडवोकेट अर्शी आज़मी, इमरान अली कुरैशी, क़ाज़ी अज़ीज़ुद्दीन, सय्यद शाहीन अली, मिर्ज़ा दौलत बेग इत्यादि पदाधिकारी जबाबदारी सांभाळत आहे.
ज़क़ात फाउंडेशन द्वारा २ वर्षापासून रमजान महीन्यात ज़क़ात ची रकम जमा करण्यात आली. या अंतर्गत मागील वर्षी एका विद्यार्थ्यास मदत करण्यात आली. तर यावर्षी सात विद्यार्थ्यांना २लाख ९५ हजार रुपये रकमेची मदत करण्यात आली आहे.
यात बी टेक, बि सी ए, पॉलिटेक्निक, बी एच एम एस सारख्या अभ्यासक्रमात उच्च शिक्षन प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत दिल्या जात आहे. या करीता स्थानिक केजीएन हॉलमध्ये दिनांक ६ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात मुस्लिम समाजातील उच्च शिक्षण प्राप्त करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना धनराशी देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी शाकिर खान पठान होते तर प्रमुख अतिथि म्हणून माजी नगरसेवक प्यारु कुरैशी, युवा समाजसेवी हुमायु मिर्ज़ा, मोहम्मद अली अजानी उपस्थित थे
प्यारु कुरैशी यांनी ज़क़ात फाउंडेशन बाबत विचार व्यक्त करताना फाउंडेशन चे माध्यमातून गरीब व गरजू मुलांना मदत प्राप्त होत आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक उन्नती हातभार लागणार आहे
अध्यक्षिय भाषणात शाकिर खान पठान ने मुस्लिम समाज शिक्षणात मागे असून जगात फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकतील असा विश्वास प्रगट केला
प्रास्ताविक प्रा. फारिश अली तर संचालन एडवोकेट मुबारक मलनस यांनी केले. आभार एडवोकेट अर्शी आज़मी यांनी मानले.