वर्धा /देवळी येथे संपन्न झालेल्या धम्मसंमेलनात डाँ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक राजु थूल यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डाँ.राजरत्न आंबेडकर यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भदंत डाँ.राजरत्न वर्धा ,मा.अनिलजी जवादे संस्थापक डाँ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था हिंगणघाट , मा राजाभाऊ टाकसाळे नागपूर ,मा. चेतना सवाई ( डफळे) चेतना शिक्षण संस्था वर्धा , मा.विकासजी साठे विधितज्ञ मुंबई , मा. सावित्री नाखले मँडम,मा गौतम पाटील वर्धा,हरले चित्रपट निर्माते यांची उपस्थिती होती. धम्मसंम्मेलनात अनेकांनी अंधश्रद्धा नष्ट करण्याबाबत आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक भदंत राजरत्न यांनी सुत्रसंचालन सुनिल ढाले यांनी तर आभार मुकुंद नाखले यांनी मानले धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मनोज जीवने, गजरे ,लोखंडे.कुंभारे यांनी अथक परिश्रम घेतले.