नाल्यावरील ढोला तुटल्याने खापरी-कोलगाव शिवारातील शेतकऱ्यांचा रस्ता बंद…..

0

🔥नाल्यावरील ढोला तुटल्याने खापरी-कोलगाव शिवारातील शेतकऱ्यांचा रस्ता बंद…..🔥नाल्यावर ढोला टाकण्याची तहसीलदारांकडे मागणी.

सेलू -/अवजड पोकलॅन्ड यंत्र रस्त्याने नेण्यात आल्याने नाल्यावरील ढोला तुटला. त्यामुळे खापरी-कोलगाव शिवारातील जवळपास ५० शेतकऱ्यांच्या शेती वाहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. कंत्राटदाराच्या पोकलॅन्डमुळे नाल्यावरील तुटलेला ढोला टाकून रस्ता करून द्यावा व मुजोर कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी ता.९ मे शुक्रवारी रोजी दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे.मौजा खापरी मुंगापूर शिवारात खासगी कंत्राटदाराकडून नाला खोलीकरणाचे काम सुरू आहे. त्या कामाकरिता आणण्यात आलेल्या अवजड पोकलॅन्ड यंत्राने खापरी-कोलगाव शिवपांदन रस्त्याच्या नाल्यावरील १२ फूट लांबीचा ढोला तुटला. त्यामुळे तो रस्ता बंद झाला आहे. नाल्यावरील ढोलाच तुटल्याने खापरी- कोलगाव शिवारातील जवळपास ५० शेतकऱ्यांच्या शेतीचा रस्ता बंद झाला आहे. नाल्यावर ढोला टाकून रस्ता सुरळीत करून देण्याची शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला विनवणी केली. मात्र राजकीय वरदहस्त असलेल्या कंत्राटदाराने ते माझे काम नाही आहे. आमदाराला सांगा! तुमच्याकडून जे बनते ते करून घ्या. असे उर्मट वर्तन शेतकऱ्यांशी केले. संबंधित कामावर नियंत्रण ठेवणारे अभियंताही कंत्राटदाराच्या दबावात असून कंत्राटदाराच्या या अरेरावीने संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत दाद मागितली. मात्र पोलिसांनीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. ऐन शेती मशागतीच्या आणि पीक निघण्याच्या हंगामात ५० शेतकऱ्यांच्या वाहिवाटीचा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहेत. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार मलिक विराणी यांना निवेदन देऊन नाल्यावरील तुटलेला ढोला टाकून रस्ता सुरळीत करून देण्याची व मुजोर कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चैताली गोमासे साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!