🔥पुनर्वसनाचे निकृष्ट दर्जाचे कामे असल्याचे पुन्हा उजागर.
आर्वी -/तालुक्यातील दौलतपूर मौजात निंबोली (शेंडे) या गावाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या गावात अठरा नागरिक सुविधांची बारा गाडे बोंब आहे. अशातच अठरा नागरी सुविधांच्या नावे झालेली कामे देखील निकृष्ट दर्जाची झाले आहे. गत आठ दिवसांपासून पाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी गळती होत असल्याने तिचे दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. त्यामुळे गावातील रहिवासींना गेल्या आठ दिवस पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत निम्न वर्धा प्रकल्प विभागला विचारणा केली असता, पुनर्वसन विभागाने या गावातील पाणीपुरवठा योजना जीवन प्राधिकरण यांना हस्तांतरीत केली आहे, त्यामुळे पाणीपुरवठा योजनेची संपुर्ण जबाबदारी जीवन प्राधिकरण यांच्या कडे असल्याचे निम्न वर्धा प्रकल्प अभियंता यांनी सांगितले आहे.
निंबोली (शेंडे) पुनर्वसन या गावाचे पुनर्वसन इतर पुनर्वसित गावांच्या तुलनेने सर्वांत शेवटी झाले आहे. तरीही या गावातील अठरा नागरी सुविधा पाहता एकही सुविधा सुस्थितीत दिसत नाही. पाण्याच्या टाकीचे बांधकाम जास्त जुने नसतांनाही टाकीची गळती व इतर टाकी संबधीत सुविधा नादुरुस्त झालेल्या स्थितीत आहे. पुनर्वसन चा निकृष्ट दर्जाची कामे करण्याची पद्धती पुन्हा निंबोली (शेंडे) येथे उजागर झाले आहे.
पाण्याची टाकी दुरूस्ती साठी पाणी पुरवठा बंद राहणार असल्या बाबत संबधीत विभागाने नागरीकांना पुर्व सुचना देणे आवश्यक होते पण त्यांनी असे केले नाही. तसेच जर त्यांना टाकीचे काम करायचे होते तर त्यांनी नागरीकांना पुर्व सुचना देऊन पर्यायी पाण्याची उपलब्धता नागरीकांना करून द्यायला हवी होती. ती सुद्धा न केल्याने पुनर्वसित गावात अघोषित पाणी बाणी लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरीकांना पाण्याची तिव्र झळा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे टाकीचे दुरुस्तीचे काम करावयाचे होते तर हिवाळ्यात न करता मुद्दामच नागरीकांना त्रास व्हावा म्हणून उन्हाळ्यात करणाऱ्यांचा सत्कारच घेतला पाहिजे अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी चारचौघात व्यक्त केल्या आहेत.