🔥हिच ति पोथरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे का?
समुद्रपूर -/तालुक्यातील मौजा वासी येथील पोथरा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सर्रासपणे सुरू आहे
नदीच्या पात्रातून रात्रीच्या वेळी रोज शेकडो ब्रास बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याचे चित्र आहे. महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर संशय निर्माण होत आहे.
ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली जात असल्याचे चित्र दिसत असताना महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून यावर कुठलीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.
बेकायदेशीर वाळूची चोरी करून शासनाच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम नंदोरी, पोथरा,वासी, मंगरूळ या क्षेत्रांमध्ये सर्रासपणे सुरू आहे. मात्र महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाकडून या वाळू माफियावर अद्याप कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांसोबत वाळू माफीयाचे तालमेल असल्यामुळे कुठलीच कारवाई होत नाही आहे
वासी येथील पोथरा नदीच्या पात्रातून सुरू असलेला वाळू उपसा महसूल विभागाच्या संमतीने सुरू आहे कि काय? असा प्रश्न स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.काही वेळातच बघा पुढील भागात सविस्तर माहिती