प्रस्तावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हिंगणघाट शहरात पुरेशी जागा उपलब्ध…..

0

हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय न झाल्यास जनतेचे मोठे आंदोलन.

हिंगणघाट -/ उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात शासकीय जागा असतानाही शहरात होणारे प्रास्तावित शासकिय वैद्यकीय महाविद्यालय वेळा येथील उद्योजकांचे खाजगी जमिनीवर उभारण्याची आमदार समीर कुणावार यांची जिद्द का? असा सवाल काल दि.६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आला.
स्थानिक हरी ओम मंगल कार्यालय येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पिंपळकर,माजी आमदार प्रा.राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे, कार्याध्यक्ष वासुदेव पडवे,सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सौ रागिनी शेंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या काही उद्योजक मित्रांच्या वैयक्तिक फायद्यासाठी आमदार समीर कुणावार हे वेळा येथील खाजगी जमीनीवर नियोजित महाविद्यालय उभारण्यासाठी प्रयत्नशील असून त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल, हिंगणघाट येथील उपजिल्हा परिसरात शासकीय जागेवरच हे नवीन महाविद्यालय न उभारल्यास मोठे आंदोलन समितीच्यावतीने तसेच हिंगणघाटच्या जनतेच्या सहभागाने करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वेळा हे ठिकाण हिंगणघाट शहरापासून १४ किलोमीटर आहे. असे शासकीय दस्तऐवज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत वेळा हे १२ किलोमीटर अंतरावर असल्याचे विधान केल्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी त्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिल्याचा आरोप लावला होता. यासंबंधी दस्ताऐवज माजी आमदार राजू तिमांडे यांनी पत्रकारांना दिले.
पत्र परिषदेच्यावेळी परिसरात रिकाम्या असलेल्या शासकीय जमिनी विषयी नकाशे व दस्ताऐवज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने पत्रकारांना दाखविण्यात आले, येथे जवळपास ४० एकर पेक्षा जास्त शासकीय जमीन उपलब्ध असल्याचे पटवून देण्यात आले.
सर्व पत्रकारांना उपजिल्हा रुग्णालय परिसरात शासकीय जागा उपलब्ध असल्याची शहानिशा करण्याकरिता प्रत्यक्ष हजर होण्याचे आवाहन सुद्धा पत्रकारांना करण्यात आले.
मल कन्स्ट्रक्शन ची खाजगी जमीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी उपलब्ध करून देताना अनेक संशयास्पद बाबी समोर आलेल्या आहेत, या जमिनीची मल कन्स्ट्रक्शन यांच्या नावे विक्री होण्यापूर्वीच शासनाला वैद्यकीय महाविद्यालयाकरीता जागा देण्याचा प्रस्तावसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
वेळा येथील खाजगी जमीन शासनाला हस्तांतरित करून मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी केला. त्यांनी हिंगणघाट शहरातच उपलब्ध असलेल्या शासकीय भूखंडावरती प्रास्तावित वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यात यावे, जेणेकरून याचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होईल असे विचार व्यक्त केले.
विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मागणी केल्याप्रमाणे मल कन्स्ट्रक्शन च्या झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी यावेळी संघर्ष समितीचेवतीने करण्यात आली.
पत्र परिषदेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सचिव सुरेंद्र टेंभुर्णे, सुरेंद्र बोरकर, जगदीश वांदिले, पदाधिकारी रागिनी शेंडे, गीता मेश्राम, शितल तिवारी, सुजाता जांभुळकर , सुजाता जीवणकर, दिपाली रंगारी,इत्यादी महिलांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!