बोटोणा गावाजवळ विध्यार्थी बसण्यापुर्वीच लालपरी नें दम तोडला….

0

चक्क दोन तास चक्कजाम, विध्यार्थी शाळेत पोहचले नाही.

आष्टी शहीद -/ तालुक्यातील थार, बोटोणा, पार्डी, बोरखेडी यां मार्गांवर दररोज धावणारी लालपरी दि.१३रोजी सकाळी १०वाजता बोटोणा गावाजवळ कॉलेज मधील विध्यार्थी यांना पाहूनच बंद पडली. बंद पडलेली लालपरी प्रयत्न केल्यावर सुरु न झाल्यामुळे कॉलेज च्या मुलींनी अखेर घरी जाणे पसंत केलें. रस्त्यावर लालपरी आडवी झाल्याने तीन चार तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
सविस्तर असें
आष्टी तालुक्यातील तळेगाव (शा. प.)आगाराची लालपरी MH४०AQ६१८३ही बस तळेगाव वरून सारवाडी मार्ग क्रमाण करित एकामाबा, पार्डी, बोटोणा गावाजवळ आली आणि बस ची वाट पाहत असलेली मुली व मुलांना पाहून लालपरी नें दम तोडला आणि बंद पडली. बंद पडलेली बस ही रस्त्यात असल्यामुळे येणारे जाणारे वाहन पुढे जावे म्हणून गावकरी यांनी धक्का मारीत मागे पुढे केली. प्रयत्न केल्यावर लालपरी चा पुढील टायर हा जमिनीत ऋतल्याने प्रयत्न फसला. आष्टी वरून कारंजा गावाकडे जाणरी लालपरी ही बोटोणा गावात येऊन थांबली. लालपरी आडवी असल्यामुळे रस्ता हा चक्का जाम झाला होता. शनिवार दिवस असल्यामुळे आष्टी चे कॉलेज दुपारी ११वाजते सुरु होते. लालपरी नें रस्त्यात दम तोडल्यामुळे आष्टी वरून येणारी बस येथेच थांबली होती. बोटोणा गावातील नागरिकांनी लालपरी धक्का देऊन मागे पुढे करण्यासाठी आटोकात प्रयत्न केलें मात्र ते निष्फळ ठरले. भंगार बसेस यां मार्गांवर धावत असल्यामुळे विध्यार्थी यांचे जीवन धोक्यात आहॆ असें नागरिक म्हणत होते. चांगल्या दर्जाच्या बसेस यां मार्गांवर सोडाव्या अशी मागणी बोटोणा येथील नागरिकांनी आगार प्रमुकहाना केली आहे. आशिष कडू, छोटू भांडवलकर, सुनील लोमटे,यांनी चालक व वाहकांना मदत केली. जाम पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी उसळली होती.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!