महाराष्ट्रात दारु बंदी कायदा करावा,सर्वोदय मंडळाची मागणी…..

0

🔥महाराष्ट्रात दारु बंदी कायदा करावा,सर्वोदय मंडळाची मागणी.

अकोला-/ महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अधिवेशन पातूर, जि. आकोला येथे स्वातंत्र्य सैनिक गंगाप्रसाद अग्रवाल स्मृति सभागृहात संपन्न झाले,त्यामधे महाराष्ट्रात संपूर्ण दारु बंदीचा कायदा करण्यात यावा,याप्रकारच्या प्रस्ताव प्रफुल्ल कुकडे,अध्यक्ष,अमरावती जिल्हा यांनी मांडला,व डॉ.शंकरराव सांगळे,अध्यक्ष,जिल्हा अकोला,यांनी तसेच दामोधर उघडे,धर्मैद्र राजपूत,अध्यक्ष, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ,सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष शंकरराव बगाडे,आबा कांबळे,अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम,बबलू रहांगडाले,अध्यक्ष,जिल्हा गोंदिया,वसंतराव केदार यांनी उपरोक्त प्रस्तावाला अनुमोदन दिले.तसेंच राज्य भरातून उपस्थित असलेले स्रि-पुरुष कार्यकर्त्यांनी हात वर करुन पाठिंबा दिला. अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे महादेवभाई विद्रोही, माजी अध्यक्ष,सर्व सेवा संघ,व ट्रस्टी यांनी भाजपचे गुजरातमधे ६५वर्षापासुन सरकार आहे,तेथे दारु बंदीचा कायदा आहे,व गुजरातचा सर्वांगिण विकास होतोय,व राज्य भरभराटी ला आहे, महिला सुखी व अत्याचार मुक्त आहेत,त्यांचे कारण गुजराथमधील दारुबंदीला आहे. नुकतेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मा.मोहन यादव भाजप सरकार असलेल्या राज्यात १९प्रसिध्द तिर्थक्षेत्री १ एप्रिल पासून देशी,विदेशी दारुची दुकाने,राज्यातील साधु, संतांचे सुचनेवरुन पूर्णपणे बंद केलीत.महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी विचारांचे,छत्रपति शिवाजी महाराज दैवत असणारे राज्य,स्वातंत्र्य सेनानी व दारु बंदीचे समर्थक महात्मा गांधी,विनोबा भावे, सावित्री बाई ,ज्योतिबा फुले, तुकडोजी महाराज, डॉ.बाबा साहेब आंबेडकर या सारख्या अनेक महापुरुषां ची तसेच तुकाराम महाराज, गाडगे महाराज आदि हजारो साधुसंतांची तपोभूमी आहे,ह्या महाराष्ट्र राज्यातही भाजप चे सरकार आहे,व या सरकारच्या लाडक्या बहिणींनीवर दारु मुळे होणारे अत्याचार व उध्वस्त होणारे संसार वाचविण्या करीता महाराष्ट्राचे सरकार ने , माझे गुजरात राज्या प्रमाणे तातडीने दारु बंदीचा कायदा करावा,व राज्यातील ४.५ कोटी मतदार असणार्या भगिनींना पुढील आयुष्यात सुखाने जगू द्यावे,अर्थात मी कांहीं नविन सांगत नसून, महाराष्ट्र व गुजरात १९६० मधे, मुंबई प्रांतात पूर्वि एकत्र होते,१मे १९६० मधे भाषावार प्रांत रचना झाली,तेव्हा दोन्ही राज्यांत मुंबई दारुबंदी कायदा १९४९ होता,व दारु बंद होती.परंतु महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी दारुचे उत्पादन केले,व ती दारु विकण्याकरीता महा राष्ट्र राज्यातील दारु बंदीचा कायदा तेव्हाचे सरकारने तोडला,व दारु विक्रीची राज्यात सर्वत्र दुकाने काढलीत,व राष्ट्रशक्ती असणारे तरुण युवकांना व्यसनाधिन केले,तसेच महिला विरोधी धोरण स्विकारले. महाराष्ट्रात वर्धा,व गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदी आहे,तर सरकारने पक्षपाती न राहता संपूर्ण राज्यात दारु बंदी केली पाहिजे,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले,त्यांच्या या भूमिकेचे सर्वोदय संमेलनात उपस्थितांनी टाळ्या वाजवून समर्थन केले.उपस्थितीमधे जेष्ठ पत्रकार.देवानंद गहले,गुरुदेव सेवा मंडळ कार्यकर्ते साहेबराव तायडे, सचिन वाढयी,संदेश राऊत,गजानन काठोळे, गोंडचवर सचिन आदि राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!