,महाराष्ट्र शासनाच्या कृती आराखड्याअंतर्गत सेलु कृ.उ.बा.समिति आवारामध्ये राबविली स्वच्छता मोहीम…

0

सेलु -/ महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत उपशाखा सेलु येथे आवर स्वच्छतेचा मोहिमेचा शुभारंभ मा.सहायक निबंधक सहकारी संस्था सेलू.सौ.निशा काकडे यांच्या हस्ते  मंगळवार ला सकाळी ९ वाजून ३० वाजता करण्यात आले होते.बाजार समिती च्या आवारात मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत असते.त्यामुळे कचरा निर्माण होत राहतो.परंतु आवार नेहमी स्वच्छता असली तर बाहेरून येणार्‍या व तिथे काम करणार्‍या कर्मचाऱ्यां च्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.यामुळे सतत स्वच्छता मोहीम राबविणे जरूरी आहे.त्याच अनुषंगाने पणन च्या पत्रकानुसार स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये कृ.उ बा.समितीचे सभापती केसरीचंद् खंगार,उपसभापती प्रमोद आदमने ,संचालक गुणवंत कडू,संचालिका रेणुका कोटंबकार,सर्व अधिकारी, व्यापारी, कर्मचारी, मापारी, हमाल व ईतर यानी आपला सहभाग नोंदवून स्वच्छता मोहीम राबविली.

चैताली गोमासे साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!