सेलू -/ नागपूर कडे जाणार्या दुचाकी वाहनाला मागाहून आलेल्या मालवाहू वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी र-वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी सेलू बायपासवर उघडकीस आली त्यामध्ये दुचाकी चालक जिवन मोरेश्वर नरांजे वय ४४ वर्ष असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.सुकळी स्टेशन येथील जिवन नरांजे हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच ३२ ऐजी ८७६० ने सुकळी येथून केळझरकडे जात असताना मागाहुन वर्धेकडून येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक एम एच ४० सीटी ६७१५ नंबर असून या मालवाहू गाडीने धडक दिली यात दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींस रुग्णवाहिकेने उपचारासाठी सेवाग्राम रूग्णालयात दाखल केले या घटनेची सेलू पोलिसात नोंद आहे.पुढील तपास सेलू पोलीस करीत आहे.