मोहन मोहिते समर्पणाची भावना बाळगणारे शिक्षक,इमरान राही..

0

बोरगाव(मेघे) -/ राष्ट्राच्या उन्नतीला चालना देणारी पिढी घडविण्याचे सामर्थ जर कोणाकडे असले तर त्यासाठी शिक्षकाकडे आदराने पाहिले पाहिजे.जीवनरूपी भावसागर तरुण जाण्याचे ज्ञान आणि तत्वज्ञान देणारे, आकाशाला गावसाणी घालण्याची प्रेरणा देणारे,अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या प्रकाशाचा मार्ग दाखवणारे शिक्षक म्हणून मोहन मोहिते यांच्या सन्मान करण्याचे भाग्य आज मला लाभले याचा मला अभिमान वाटतो. शिक्षक हे निव्वड पद नसून विद्यार्थ्यांप्रती समर्पणाची भावना बाळगणारे ते एक महान व्यक्तीमत्व असते. असे आदर्श शिक्षक लाभणे ही सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. असे प्रतिपादन स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संरक्षक इमरान रही यांनी व्यक्त केले.ते सत्येश्वर लॉन येथे आयोजित स्नेहबंधन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. या प्रसंगी स्पोर्ट कराटे असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इखार, सचिव मंगेश भोंगाडे, कोषाध्यक्ष विजय सत्याम, पवन तिजोरे, गंगाधर पाटील, भगवानदास अहुजा, प्रवीण पेठे, संतोष सेलुकर, सचिन झाडे, विलास कुलकर्णी, प्रकाश खंडार, निखिल सातपुते, श्याम पटवा, सुनील चंदनखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मोहन मोहिते यांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पुजा गोसटकर यांनी केले तर आभार सुशांत जीवतोडे यांनी मानले.

गजानन जिकार साहसिक news-24 तुळजापूर वघाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!