यवतमाळ एलसीबी प्रमुख सतीश चवरेंची दरमहा सव्वा कोटींची वसुली

0

🔥हेच ते यवतमाळ एलसीबी प्रमुख सतीश चवरेंची दरमहा सव्वा कोटींची वसुली.🔥पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधीक्षक कुमार चिंतांवर संशयाची सुई!🔥हाच तो गुटखा तस्कर कुमार ओझाणी मोक्कातील आरोपींकडून १२ लाखांची लाच; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) मालमत्तेच्या चौकशीची मागणी!

​यवतमाळ (विशेष प्रतिनिधी)-/ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा गुन्हेगारांचे फावते! यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे हृदय मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) सध्या कर्तव्याचा नव्हे, तर ‘वसुलीचा’ धुमाकूळ सुरू आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी आपली खुर्ची टिकवण्यासाठी जिल्ह्यात टोकाचे वसुली धोरण आखले असून, दरमहा तब्बल सव्वा कोटी रुपयांचा हप्ता उकळला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या वसुलीबाज अधिकाऱ्याविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता ‘ब्र’ शब्दही काढायला तयार नाहीत. त्यामुळे या कोट्यवधींच्या हप्तेबाजीत थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांचाही वाटा आहे का? असा घणाघाती संशय आता नागरिक आणि सामाजिक वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. “रक्षकच झाले भक्षक, तर कोणाकडे मागायची दाद?” अशी स्थिती सध्या यवतमाळ जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

​स्थानिक गुन्हे शाखेची मुख्य जबाबदारी गुन्हेगारी मोडून काढणे ही असताना, सतीश चवरे यांनी मात्र शहराला अवैध धंद्यांचा अड्डा बनवले आहे. अमरावती येथील कुख्यात गुटखा तस्कर जावेद सुपारीवाला आणि अमित कल्याण यांच्याशी थेट हातमिळवणी करून यवतमाळात सर्रास गुटखा तस्करी, गोवंश तस्करी आणि हायप्रोफाईल जुगार अड्डे सुरू करण्यात आले आहेत. यवतमाळ शहरातील प्रत्येक चौकात आणि गल्लीबोळात उघडपणे जुगार अड्डे चालवले जात आहेत. कारवाईचे केवळ कागदोपत्री सोपस्कार आणि थातूरमातूर नाटक करून पोलीस जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. प्रत्यक्षात मात्र तस्करांचे ताट वाजत असून, पोलिसांचे खिसे भरत आहेत.
​तस्करांचा ‘डावा हात’ मानल्या जाणाऱ्या आणि गंभीर स्वरूपाच्या ‘मोक्का’ गुन्ह्यातील आरोपी कुमार ओछाणी याला सतीश चवरे यांनी उघडपणे मोकळे रान दिले आहे. गुटखा तस्कर कुमार ओछाणी याचा भागीदार प्रकाश गोविंदानी याच्याकडून तब्बल १२ लाख रुपयांची लाच घेतल्याचा ठोस पुरावा हाती लागला आहे. एवढे मोठे पुरावे समोर येऊनही, लाच देणारा प्रकाश गोविंदानी आणि लाच लाटणारे एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्यावर साधी चौकशीची टांगती तलवारही आलेली नाही. पोलीस दलातील हे साटेलोटे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
​शेजारच्या अकोला जिल्ह्यात गुटखा माफियांवर धडक कारवाई करत पोलिसांनी मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल केले. तेथील आरोपी फरार झाल्यावर अकोला एलसीबीने तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपींना गजाआड केले. परंतु, यवतमाळ एलसीबीचे प्रमुख सतीश चवरे यांनी मोक्कातील आरोपी कुमार ओछाणीला अटक करण्यासाठी साधे बोटही हलवले नाही. यवतमाळ एलसीबीचे काम आता केवळ ‘गुन्हे ब्रेकिंग’ करणे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. वास्तविक गुन्हेगार मात्र पोलिसांच्या छत्राखाली मजेत फिरत आहेत.
​यवतमाळ शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि उघडपणे चालणारे अवैध धंदे ही पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणाची जिवंत उदाहरणे आहेत. सतीश चवरे यांच्या खाजगी वसुलीबाज कर्मचाऱ्यांच्या फौजेने संपूर्ण यवतमाळ शहर वेठीस धरले आहे. महिनाकाठी जमा होणाऱ्या सव्वा कोटींच्या वसुलीत स्थानिक गुन्हे शाखेव्यतिरिक्त अजून वरिष्ठ स्तरावर कोणाकोणाचे भले होत आहे, याची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे.
​त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने हस्तक्षेप करावा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याही अथाह बेनामी मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी आणि या वसुलीबाज अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून बेड्या ठोकण्यात याव्यात, अशी तीव्र मागणी यवतमाळच्या जनतेतून आणि राजकीय वर्तुळातून केली जात आहे.(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!