देवळी -/ येथील व्यवसायिकाकडून ग्राहकांना माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते विविध वस्तूंचे बक्षिसांच्या स्वरूपात वितरण करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहनलाल अग्रवाल, नगरसेवक राहुल चोपडा, नगरसेवक विलास जोशी, व्यवसायिक प्रकाश कांकरिया , अशोक कुमार सुद्धा, विठ्ठलराव जावंधीया ,राजीव बग्गा,
यांची प्रमुख उपस्थिती होती. निमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी माजी खासदार रामदास तडस यांनी व्यावसायिकाला शुभेच्छा देऊन उपस्थित युवकांना व्यवसायिकाकडे वळून आपले आर्थिक उत्पन्न बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या व्यवसायातील मिळकतीतून ग्राहकांना सुद्धा काही ना काही वाटा वस्तू स्वरूपात ग्राहकांना दिल्यास व्यवसायामध्ये ग्राहक त्या व्यवसायिकाकडे आपुलकीने खरेदी करतात. असे यावेळी त्यांनी सांगितले. देवळी येथील व्यवसायिक हेमंत जावंधीया यांनी माहेश्वरी सुपर बाजार व मोबाईल गॅलरी व्यवसाय सुरू केला असून ते 44 वर्षापासून व्यवसाय करीत आहे. त्यांनी या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता भेटवस्तू उपहार ही लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे. ड्रॉ काढून नंबर लागलेल्यांना विविध स्कूटर ,सायकल, फ्रिज, टीव्ही अशा अनेक वस्तू 1.5 लाख रुपय किमतीच्या वस्तू ग्राहकांना पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आल्या यावेळी नगरसेवक राहुल चोपडा प्रकाश कांकरिया, ओम प्रकाश राठी सिंधी रेल्वे, यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आणि आजच्या युवकांनी व्यवसाय करून प्रगती करावी असे सांगितले. स्कुटी बक्षीयाचे मानकरी शत्रुघन सुरतकर, फ्रिज दीपक खोब्रागडे, वाशिंग मशीन अविनाश नासार, एलईडी टीव्ही गजानन शिदोळकर अशा विविध 100 ग्राहकांना बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन सागर कपूर यांनी केले तर आभार प्रदर्शन ओम प्रकाश राठी यांनी केले.