हिंगणा -/तालुक्यातील रायपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने दसरा उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रमेशचंद्रजी बंग यांच्या हस्ते डॉ. प्रवीण पडवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यास प्रतिष्ठित मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. रायपूर ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक सरपंच उमेशभाऊ आंबटकर, जिल्हा परिषद नागपूरचे माजी सत्तापक्ष नेते बाबाभाऊ आष्टणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग, पोलीस स्टेशन अधिकारी जितेंद्र बोबडे, माजी सरपंच जगदीशभाऊ कन्हेर, ज्येष्ठ नेते व सत्कारमूर्ती श्री विठ्ठलरावजी कोहाड, समाजभूषण पिलाजी बनकर, युवा अध्यक्ष नागपूर जिल्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघ अनिलभाऊ चानपूरकर व सौ. वीरश्रीताई चानपूरकर,शशिकांतजी थोटे, सौ. अरुणाताई बंग, प्रकाशभाऊ वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दसरा उत्सव समितीचे अध्यक्ष मुकेश कथलकर यांनी भूषविले. पारंपरिक विधी व उत्साहात झालेल्या या सोहळ्यात समाजातील कार्यकर्त्यांचा सन्मान करून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सेवा हीच खरी विजयादशमीची प्रेरणा असल्याचा संदेश देण्यात आला.