राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आर्वी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार निष्ठवंत, युवा चेहरा असावा, अशी अपेक्षा आर्वी, कारंजा व आष्टीकर व्यक्त करीत आहेत…..
आष्टी शहीद -/राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा लोकसभा निवडणुकीत आर्विचे माजी आमदार अमर काळे निर्वाचित झाल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आर्वी मतदारसंघ काबीज करण्याचें वेध लागले आहेत. पक्षांचे नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यातील अंतर्गत चर्चा लक्षात घेता, पक्ष उमेदवार निवड अधिक सजग आणि काळजीपूर्वक करणार याबाबत खात्री बाळगून आहेत.पक्षात सध्या कार्यरत पदाधिकारी , नेते यांचा विचार करता, लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आष्टी तालुक्यातील युवा आणि प्रगल्भ वक्ता म्हणून ओळख निर्माण झालेला चेहरा, शुभम नागपुरे यांच्याबद्दल युवकांमध्ये पसंती मिळत असल्याचे कळते.एकाएकी हा कोण नवा चेहरा असावा तर अस नाही, हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक कार्यकर्ता ते युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा आष्टी तालुका अध्यक्ष ते सध्या प्रदेश सरचिटणीस पदापर्यंत आपल्या कर्तृत्वावर पोहोचला आहे.शुभम नागपुरे एक सुशिक्षित व्यक्तीमत्व आहे फक्तं शिक्षित नाही. हा युवक रासायनिक अभियांत्रिकी पदवी संपादन केलेला असून व्यवसायिक जगतात व्यावसायिक नेतृत्वाचा प्रशिक्षक म्हणून ख्यातनाम आहे. तसेच नवनिर्माणाची जिद्द बाळगणारा, प्रेरणादायी वक्ता, व्यवस्थापन कौशल्य, संभाषण चातुर्य, सामजिक विषयावर सार्वजनिक मतप्रवाह तयार करण्यात निपुण, समाज माध्यमावर प्रभाव निर्माण करण्याची क्षमता असलेला, असा अनेक प्रतिभा संपन्न युवा कार्यकर्ता आहे.विशेषत्वाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगितेचा अभ्यासक आणि प्रचारक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेला गुरुदेव धर्माला जागतीक पातळीवर प्रसारित करण्याचा संदेश गुरुदेव भक्तांना दिला होता. या संदेशाच शब्दनुशब्द शुभम प्रत्यक्षात अनुपालन करित आहे. जगातील अनेक देशांत समाज माध्यमावर ग्रामगीता प्रबोधन करणे, जागतीक गुरुदेव भक्त आणि गुरुकुंज मोझरी आश्रम यात महत्त्वपुर्ण दुवा म्हणून ओळख निर्माण केली आहे. तसेच तो एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर सुध्दा आहे. आंतरराष्ट्रीय गुरुदेव भक्तांना, प्रवाश्यांना, अभ्यासकांना मोझरी येथे आणून त्यांच्या भाषांमध्ये अनुवाद करून, ग्रामगीतेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रसंगी नोकरी आणि कुटुंब यांची पर्वा न करणारा हा युवक आर्वी मतदार संघात भविष्य उज्वल करण्यासाठीं सक्षम उमेदवार ठरू शकतो, अशी सार्वत्रिक चर्चा कानावर पडत आहे. मुख्य झालेले लोकसभा निवडणुकीत संपूर्ण लोकसभा क्षेत्रात तसेच अमरावती जिल्ह्यातील काही भागात शुभम यांनी प्रवक्ता म्हणून पक्षाचे काम केले आहे व त्यामुळे त्यांना पूर्ण भागातील अभ्यास असून लोकांची नागरिकांची अडचण पाहायला मिळालेली आहे पक्षातील नेत्यांनी शुभम नागपुरे यास उमेदवारी देण्याबाबत सुस्पष्ट भुमिका घ्यावी याकरता अनेक पदाधिकारी जिल्ह्याच्या नेत्या यांच्या माध्यमातुन पक्षांचे सर्वेसर्वा आदरणिय शरद पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष आमदार जयंत राव पाटिल यांना साकडं घालन्याचा निश्चय करून आहेत.