राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी सुनील राऊत यांची नियुक्ती.

0

🔥राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी सुनील राऊत यांची नियुक्ती.

वर्धा -/ आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात ७ एप्रिल २०२६ रोजी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी श्री. सुनील राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सदर नियुक्ती पत्र देवून नियुक्ती करण्यात आली आहे.

सुनील राऊत यांच्यावर सोपवण्यात आलेली ही जबाबदारी पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सांगितले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून सुनील राऊत यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वर्धा जिल्ह्यात कानाकोपऱ्यात पोहोचेल, तसेच त्यांना राजकीय कामाचा दांडगा अनुभव असून त्यामुळे पक्षाची पकड अधिक मजबूत होईल.

यावेळी प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, प्रवक्ते नितेश कराळे, युवक प्रदेश संघटक संदिप किटे, युवक वर्धा जिल्हाध्यक्ष प्रणय कदम उपस्थित होते.

          गणेश रेंगे साहसिक         News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!