लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या व इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल…..

0

🔥हाच तो लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तृतीयपंथी महिलेचे शारीरिक शोषण व इमोशनल ब्लॅकमेल करणारा नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

वर्धा -/ तृतीयपंथी वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल एक वर्ष तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या तसेच,तिला प्रेमापोटी वारंवार पैशाची मागणी करून इमोशनल ब्लॅकमेल करणाऱ्या नितीन सोळंके उर्फ भाया वर रामनगर पोलिसांनी ९ मे रोजी  गुन्हा दाखल केलेला आहे.आरोपी फरार असून पुढील तपास चालू आहे.

तसेच नितीन सोळंके उर्फ भाया याची ओळख कोर्टाच्या कामानिमित्त तृतीयपंथी महिला वकीलासोबत झाल्यानंतर तिची सुंदरता बघून तिच्याशी जवळीक साधण्याचा त्याने प्रयत्न केला. काही महिन्यानंतर स्वालंबी ग्राउंड मध्ये पुन्हा त्यांची भेट झाल्यानंतर दोघांमध्ये बोलचाल वाढली. नितीन ने तृतीयपंथी असलेल्या वकील ला पर्सनल लाईफ बद्दल विचारले असता तिने सिंगल असल्याचे सांगितले यावर नितीन ने “तू एकटी कधीपर्यंत राहशील तुला कधी तर तुझा पार्टनर बघावा लागेल “, ” मला तू खूप आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, तुला मुलं होऊ शकत नाही पण लग्नानंतर आपण एखादा मुलगा दत्तक घेऊया ” असे म्हटले.

दहा वर्षा अगोदर नितीन चे लग्न झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशीच त्याची पत्नी त्याला सोडून गेली,ही कहाणी तिच्यासमोर सांगितल्यामुळे ती भावुक झाली व दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले आणि त्यांच्यात शारीरिक संबंध होत गेले. नीतिन एकटा असल्यामुळे मला तुझ्या सोबत राहायचं आहे असे म्हटल्याने तिच्याकडे दोघेही जण पती-पत्नी प्रमाणे राहू लागले.

नितीन हा बँकेमध्ये डेली कलेक्शनचे काम करत असून त्याला महिन्याचे फक्त ८,५००/- रुपये मिळतात, त्यातही त्याला रोज दारू पिण्याचे व्यसन आहे. तिची कमाई चांगली आहे हे बघून तिला वारंवार दारू पिण्याकरिता नितीन हा पैशाची मागणी करत होता, प्रेमापोटी तिने पैसेही त्याला देऊ केले, ही सवय वाढल्याने तो कधी मोबाईल घेण्याकरिता, तर कधी गाडी घेण्याकरिता तिला पैशाची मागणी करत होता तरीही ती प्रेमापोटी त्याला पैसे देत गेली.

त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने त्याला पैसे देणे बंद केले,नंतर जानेवारी २०२५ मध्ये तिने नितीन ला लग्न करिता विचारले असता त्याने ” तू मला पैसे देऊ शकत नाही मला सांभाळू शकत नाही तर मी तुझ्याशी लग्न कशाला करू” असे उत्तर दिले.
हे एकूण तिला धक्का बसला व ती डिप्रेशन मध्ये गेली कारण नितीन ने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल १ वर्ष तिचे शारीरिक शोषण केले होते.

याच कारणामुळे तिने नितीन सोबत सर्वच प्रकारचे संबंध कायमचे तोडले होते. तरीही नितीन तिच्या घरी दारू पिऊन जबरदस्ती घुसला व तिला अश्लील शिवीगाळ करू लागला, तिला अनेक ठिकाणी अडवून परत संबंध ठेवण्याकरिता तो तगादा लावत होता.

१९ मार्च २०२५ रोजी ला सायंकाळी साडे सातच्या दरम्यान स्वावलंबी ग्राउंड वर नितीन ने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता तिने आजपर्यंत दिलेले ९५ हजार मला कधी परत करशील असे विचारले असता त्याने “मी तुला पैसे तर परत करणार नाही पण तुले चाकू मारून देईन, तुले जे कराच हाये ते करून घे ” असे उत्तर दिले. आणि अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

एका तृतीयपंथीला खोटं लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण करणे व तिला इमोशनल ब्लॅकमेल करणे हे कितपत योग्य आहे? ज्या लग्न समारंभात आपण तृतीयपंथींचे आशीर्वाद पवित्र मानतो त्या तृतीयपंथी सोबत असा प्रकार घडला कितपत योग्य आहे? याच कारणांमुळे संपूर्ण देशामध्ये तृतीयपंथीयांच्या आत्महत्याचे प्रमाण ३२% ते ५०% पर्यंत पोहचले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!