वर्धा येथे राष्ट्रीय खैरे कुणबी समाज संघटनेची विचार मंथन बैठक संपन्न….

0

🔥वर्धा येथे राष्ट्रीय खैरे कुणबी समाज संघटनेची विचार मंथन बैठक संपन्न.

वर्धा -/ राष्ट्रीय खैरे कुणबी समाज संघटनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून विचार मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत खैरे कुणबी समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच बेरोजगार तरुणांच्या समस्यांवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.
या समस्यांवर संघटनेच्या वतीने प्रयत्न करण्यात येईल. असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुणेश्वरजी आरिकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव भोयर यांनी केले, त्यांनी संघटनेच्या मंथन बैठकीच्या उद्देशाची तसेच संघटनेच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गुणेश्वरजी आरिकर हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खैरे कुणबी रणरागिणी मंचच्या अध्यक्षा संगीताताई बढे होत्या.कार्यक्रमाचे सुरुवातीस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच माॅ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.बैठकीत विविध जिल्ह्यांतून आलेल्या समाजबांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाला प्रमोदराव भोमले, रामदासजी बाकरे, दिवाकरराव तिजारे, प्रकाशराव भोयर, कपिलजी थुटे, अरविंदराव बोटफोले, आशिषजी व्यापारी, कविश्वरजी खडसे रामटेक, पुस्तारामजी भोयर रामटेक, विलास दाबडदुबके रामटेक, राधेश्याम चौधरी रामटेक, विनोदजी सातपुते हिंगणघाट, चंद्रकांतजी ससाणे पुलगाव, इ. उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बाबाराव भोयर, महादेवराव तांगडे , दिवाकरराव कोरेकार, राजेंद्र अनफाट, प्रमोदराव भोमले, संगिताताई बढे, दामोदरराव मुडे, प्रकाशराव भोयर यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर ठाकरे यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन बाबाराव भोयर यांनी केले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!