वर्ध्यात केकवर तलवार पडली भारी… तरूणालाच करावी लागली तुरुंगाची वारी
By साहसिक न्युज 24
इकबाल पहेलवान/हिंगणघाट:
शहरातील एका युवकाने स्वतःच्या जन्म दिवसा निमित्त आतिशबाजी करीत तलवारीने केक कापल्यामुळे त्याला त्यांचा वाढदिवसाच्या दिवशी तुरुगाची वारी करावी लागली आहे.
हिंगणघाट शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील प्रज्वल सुनील कडू वय 25 याने त्याच्या वाढदिवसाचा केक चक्क तलवारीने कापून भर चौकात धुमाकूळ घालत असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांना पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्या तरुणास ताब्यात घेऊन त्याचेवर शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगाची वारी करण्यास पाठवले. हिंगणघाट शहरात भाईगिरीला ऊत आला असून गुंडागर्दी करणाऱ्यांमधे तलवारीने केक कापन्याची प्रथा रूढ झाली आहे.
परतु तलवार काढणे, धुमाकूळ करणे हे बेकायदेशिर असून पोलिस कारवाई होऊ शकते याकडे शहरातील युवकवर्ग दुर्लक्ष करीत असल्याने असे प्रकार घडत आहे.यापूर्वीसुद्धा एका युवकांवर वाढदिवस साजरा करतांना तलवारीने केक कापल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती.
विषेश महाविद्यालयीन युवकांमधे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर जन्मदिवसाचा केक कापण्याची प्रथा वाढीस लागली असल्याचे दिसुन येत आहे. काल तलवारीने केक कापणाऱ्या युवकावर पोलिस निरीक्षक के.एस. पुंडकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार शेखर डोंगरे, नायक पोलिस शिपाई निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले, समीर गावंडे यांनी ही कारवाई केली आहे.