माहूर -/किनवट-माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांची विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेटी देऊन गणराचे दर्शन घेतले आणि श्रीगणेशाची आरती केली.यावेळी नाईक यांचा विविध मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.तालुक्यातील वाई बाजार येथील श्री गुरुदेव मंदीरात स्थापण करण्यात आलेल्या श्री शिवा गणेश मंडळासह येथील विविध गणेश मंडळाला मा.आमदार प्रदीप नाईक यांनी भेट देऊन सन्मानजनक देणगी गणेशाच्या चरणी अर्पण केली.याप्रसंगी श्रीशिवा गणेश मंडळाचे अध्यक्ष ओंमकार खराटे व सदस्यांनी नाईक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.त्याच बरोबर जि.प.चे माजी. उपाध्यक्ष समाधान जाधव यांचा हि सत्कार केला.याप्रसंगी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थानी विविध समस्यावर चर्चा करून त्यावर लक्ष देण्याची विनंती केली.मा.आमदार नाईक यांचे समेवत माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते,विनोद राठोड,नावेद खान,अमजद खान,अञीनंदन शिंदे,नितिन कदम,अनूप गेंटलवार,रोणीत पबीतवार,पञकार कार्तिक बेहेरे तर मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष गणेश हिवाळे,कोषाध्यक्ष प्रतिक बेहेरे,ओंमकार सातव,प्रतिष कट्टकमवार,अदित्य लुटे,शुभम सातव,श्रिजय गवळी,संस्कार पबीतवार,संकेत सलाम,संकेत सातव,अभय तंलाडे,गणेश सलाम,श्रीनाथ थोंटे,आदेश सुरोशे,रोहित माणे,योगेश उदीमकर,मथंन पवार,यांचेसह महाविकास आघाडीतील अनेक कार्यकर्त्ये व पदाधिकारी उपस्थित होते.