आर्वी -/श्री रेणुका देवी मंदिर, आर्वी येथे चैत्र नवरात्र महोत्सवाची शुभ सुरुवात पारंपरिक विधींसह करण्यात आली. पहाटे ६ वाजता श्री यंत्र मंदिरात प्रशांत आणि सौ. शुभदा सव्वालाखे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. धार्मिक विधींनंतर मंदिरात मंगल आरती आणि देवीच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले.सकाळी पवित्र घटस्थापनेनंतर मंदिरात देवीच्या पारंपरिक स्तोत्र पठणाने भक्तगणांनी देवीची आराधना केली.कल्पेश दवे महाराज,आकाश महाराज,अशोक दवे महाराज यांनी मंत्रोच्चारासह घटस्थापनेची पूजा पार पाडली.यानंतर देवीची विशेष महाआरती करण्यात आली, भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.या उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर विद्युत रोषणाईने झळाळून निघाले असून, परिसरात भक्तांसाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने दररोज यजमानांच्या हस्ते अभिषेक, पूजन व शृंगार व महाआरती केली जाते. यासह विविध मंडळांचे भजन, कीर्तन आणि हवन यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे.प्रशांत सव्वालाखे, वैभव सव्वालाखे, सुरेश सरोद, पुंडलिकराव अवथळे नंदू इरावार, मोरेश्वर देशमुख, प्रकाशराव देऊळकर, बाळा कोंडलकर, नानासाहेब देशमुख, वैभव देऊळकर,चंद्रकांत भोयर, सुधीर भांडे, गौरव जाजू, ताराचंद नेहारे, विष्णुप्रसाद भारती, हितेंद्र शिंदे, अनिलराव मोरे, नानासाहेब देशमुख, अनिल लांडगे, दिवाकर भेदरकर, संजय थोरात, प्रवीण पावडे, गजू कोंडलकर, प्रमोद कोंडलकर, सूरज देऊळकर, महेंद्र पोकळे, नागेश गडापले, राजू शिरभाते, उल्हास भोळे, योगेश ताजनेकर, सर्वेश भार्गव, सुनील पारसे, वर्षा चोरे, पूजा चोरे, आशा इरावार, शुभदा सव्वालाखे, प्रियंका सव्वालाखे, अंजली लोखंडे तसेच मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व भाविकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.