श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाला झाली सुरवात….

0

🔥श्री संत केजाजी महाराज पुण्यतिथी उत्सवाने दुमदूमली सेलू-घोराड नगरी. 🔥दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

सेलू,घोराड -/ विदर्भाची प्रतीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराजांची ११८ वी पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात येत आहे.महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यानिमित्त दहा दिवस २२ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.परंपरेनुसार होणारा दिंडी सोहळा तथा महाप्रसाद यासाठी संत केजाजी सेवा मंडळ तथा गावातील तरुण युवकांचा पुढाकार असतो. २२ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता भागवत ग्रंथाची मिरवणूक काढून कथेला प्रारंभ होणार आहे.श्री संत केजाजी महाराज यांच्या महानिर्वाणदिनी २९ जानेवारीला समाधीपुजन व भजनाचा कार्यक्रम होईल. ३० जानेवारीला भव्य दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जानेवारीला काल्याचे किर्तन,तसेच दहिहांडी काला आणि सायंकाळी महाप्रसादाचे वितरण होईल.महानिर्वाण दिनी विदर्भातील विविध जिल्ह्यातील भाविक घोराड मध्ये दाखल होतात ३० आणि ३१ जानेवारीला घोराडमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. ३० ते ४० हजार भाविकांना पंक्तीचे माध्यमातून येथे महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे प्रवेशद्वारासह मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण गाव तोरण पताकांनी सजले असून ठीकठिकाणी स्वागतद्वार उभारण्यात येत आहे.संत येती घरा,तोची दिवाळी दसरा’ या म्हणीचा प्रत्यय येथे ३० आणि ३१ जानेवारीला येतो.घराघरात पाहुणे मंडळी असते या गावातून सासरी गेलेल्या मुली त्यादिवशीला गावात येतात.
२८ जानेवारीला सायंकाळ ६ वाजता हभप महेश् महाराज देहुकर (पंढरपूर) यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल आहे.विठ्ठल वानोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथे २२ जानेवारी पासून दररोज पहाटे ५.३० ते ६.३० काकड आरती, ज्ञानेश्वर पारायण, पारायणकार प्रमोद महाराज ठाकरे राहणार आहे. सायकांळी ६ ते ७ हरिपाट २२ ते २८ जानेवारी पर्यंत श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भागवताचाय हभप शाम महाराज काळमेघ (अमरावती) हे भागवत कथेला संबोधित करणार आहे याशिवाय दररोज पहाटे दह दिवस ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. य कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान समिती तथा केजाजी सेव मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.

 चैताली गोमासे साहसिक NEWS-24 सेलू-घोराड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!