संकटाचे संधीत रूपांतर करणारे मुख्यमंत्री ; जनतेच्या पसंतीस उतरलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन होऊन आता दोन वर्षे होत आहेत. वेगवेगळ्या विचाराचे तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन झालेलं सरकार जनता मान्य करणार नाही. (या पूर्वी शरद पवार यांनी महाराष्ट्रात केलेला पू.लो.द. प्रयोग यशस्वी.होऊ शकला नव्हता.) त्यामुळे हे सरकार टिकेल की नाही, टिकलेच तर वर्षभरात कोसळेल, ही जन भावना महाराष्ट्रातील जनतेची होती. त्यातही या सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री विधिमंडळ आणि मंत्रिमंडळाचा अनुभव नसणारे नवखे. त्यामुळे सरकार चालविण्याची किमया निश्चितच तारेवरची कसरत होती. उद्धव ठाकरे यांनी हि कसरत करण्याची भूमिका स्विकारली. आणि त्यात निश्चितच ते या दोन वर्षात यशस्वी झाल्याचे माध्यमांच्या सर्व्हे वरून सिद्ध झाले.
होय ! हे तीनचाकी सरकार,आपली दोन वर्षाची कारकीर्द यशस्वी पणे पूर्ण करीत आहे.त्याचे अवघे श्रेय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच द्यावे लागेल. शेवटी टीम ची कसोटी ही कॅप्टन वर असते. आणी आजचा जो माध्यमांचा सर्वेक्षण आहे. त्यात जनतेने मुख्यमंत्री म्हणून पहिली २७% पसंती उद्धव ठाकरे यांना दिली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर महविकास आघाडी सरकारने गरीब, फक्त शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतकऱ्यांची १५०००० रूपयांची कर्ज माफी केली. शिवसेनेनं आपल्या वचन नाम्यात दिलेलं वचन पूर्ण केलं. पण नंतर कोरोनाच संकट उभ झालं. गेली दोन वर्षे सर्व व्यवहार ठप्पच होते.पण मुख्यमंत्र्यांनी अतिशय नम्रपणें हि परिस्थिती सांभाळली.गेली दोन वर्षे वादळ, वारा, अती पाऊसाने महाराष्ट्रात तुफान, संकटे उभी केली.कोंकण दोन वेळा संकटात सापडले.विदर्भ,उत्तर महाराष्ट्र,प.महाराष्ट्र,मराठवाडा येथे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. उत्पन्नाचे साधन मर्यादित असतांना व केंद्र सरकारची तुटपुंजी मदत असतानाही शेतकऱ्यांना मदत करण्यात आली.
वास्तविक मुख्यमंत्र्यांना आपली कामाची चुणूक दाखविण्याची योग्य संधीच मिळाली नाही. कोरोणा काळात सुद्धा अनेक उद्योगिक करार झालेत. मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी अविरत प्रयत्न केले.
महाराष्ट्रात पर्यटनाची उत्तम संधी आहे. पण आतापर्यंत पर्यटन क्षेत्रात पाहिजे तस काम झालं नाही. त्यामुळे उत्तम आणि मोठा समुद्र किनारा, अनेक प्रेक्षणीय स्थळे असूनही इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र पिछाडीवर होता. पण कोरोणा काळाच्या संधीचा उत्तम फायदा करून घेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यटन,पर्यावरण या क्षेत्रात भरघोस प्रगती केली. याचाच परिणाम म्हणून जागतिक स्तरावरील पर्यावरण परिषदेत संपूर्ण भारतातून महाराष्ट्राला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हि या देशासाठी मोठी बाब आहे. अनेकांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न सतत सुरू ठेवले आहेत. शासकीय यंत्रणेचा वापर करून गुन्हे दाखल होत आहेत. सुशांत सिंग , कंगना राणावत, ड्रॅग प्रकरण, यातून महाराष्ट्राची बदनामी केली जाते आहे. पण सरकार ठाम आहे. ठाम राहणार आहे. पाच वर्षे आपली कारकीर्द पूर्ण करणार आहे. शिवसेनेनं हिंदुत्व कधीच सोडल नाही आणि सोडणार नाही. या देशात हिंदुत्वाच्या बळावर निवडणूक लढविली ती फक्त शिवसेनेने. यामुळे शिवसेनेच्या तिन आमदारांना निवडणूक लढण्यास न्यायालयाने बंदी घातली होती. सुभाष देसाई, रमेश प्रभू, सूर्यकांत महाडिक हे आमदार होते. शिवसेनाप्रमुख असताना भाजपा ने शिवसेनेला वापरून घेतल. उद्धव ठाकरे याच्याही शरीरात तेच भगव रक्त संचारत आहे. पण ते फक्त भाजपाला भिक घालत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेशी सोबत केल्याशिवाय कोणीही सरकार चालवू शकत नाही.
उद्धव ठाकरे हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. ते शांत, संयमी,कार्यसम्राट असल्याने शिवसेना एक दिवस दिल्ली काबीज केल्याशिवाय राहणार नाही.

दिलीप भुजाडे, शिवसेना,
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!