सिंदी (रेल्वे) -/देवशयनी आषाढी एकादशी व इस्लामिक नववर्ष मोहरमच्या शुभदिनी वर्धा जिल्ह्याचे नवनिर्वाचित शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोकप्रिय खासदार अमर काळे यांचे बुधवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान सिंदी शहरात जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान, खासदार काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच देवशयनी आषाढी एकादशी व इस्लामिक नववर्ष मोहरमचे औचित्य साधून प्रथमच दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास सिंदी शहरात खासदार अमर काळे यांचे अचानक आगमन झाले. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर समर्थक फिरोज बेरा यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार काळे म्हणाले की, लोकसभेची निवडणूक एक परीक्षा होती. त्या परीक्षेत मतदारांच्या आशीर्वादामुळे आपण उत्तीर्ण झालो. हा जनतेचा आशीर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. मला हा बहुमुल्य सम्मान कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाला. त्यामुळे केंद्र शासनाच्या विविध योजना आणून विकास कसा साधता येईल यादृष्टीने प्रयत्न करून सिंदी शहराचा विकास करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार काळे यांनी यावेळी दिले. दरम्यान, खासदार काळे यांनी देवशयनी आषाढी एकादशी तसेच इस्लामिक नववर्ष मोहरमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे सिंदी शहर युवा अध्यक्ष तुषार हिंगणेकर, अफजल बेरा, ख.वि.सं. चे माजी उपसभापती सुधाकर वाघमारे, दिनेश घोडमारे, बंटी बेलखोडे, युगल अवचट, सुनील शेंडे, जगदीश बोरकर, रामअवतार तुरक्याल, रवी बेलखोडे, विशाल चिंचुलकर, धनराज झिलपे, गुड्डू कुरेशी, गजानन खंडाळे, सुधीर झिलपे, रवी राणा, विकास झाडे, अभि काळबांडे, सूरज पडोळे, भीमराव फुलमाळी, निलेश सुरकार, गजानन घोडे, हर्षल बडवाईक, अतुल काळबांडे, हर्षल मोरस्कर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.