🔥सिंदी रेल्वे येथील पाण्याचा प्रश्न निकाली काढणार खासदार अमर काळे…..
वर्धा,सिंदी रेल्वे -/शहरातील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दालनात खासदार अमरभाऊ काळे, प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले,जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत व महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली.सिंदी रेल्वे नगरपरिषदेला नवीन कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावे.शहरात पाणी पुरवठा पुर्वी प्रमाणे माहे एप्रील,मे,जून मध्ये दोन दिवसांआड व बाकी वेळेसे एक दिवसाआड पूर्वीप्रमाणे नियमीत पाणी पुरवठा करण्यात यावे.वाकसूर येथे ३० हार्स पॉवरच्या मोटार पंप लावण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांनी सिंदी रेल्वे शहरातील पाण्याची भीषण परिस्थीती बघता पाणी पुरवठ्याची समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर,सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, काँग्रेसचे नेते आशिष देवतळे यांच्यासह शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.