सेलूत दूचाकीचा अपघात;१ ठार एक जखमी

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/वर्धा:
सेलू तालुक्यातील खडकी येथील दोन युवक हिंगणी मार्गे देवळी पेंढरी कडे जात असतांना त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच 32 एपी 1003 या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली, त्यात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला तर एक जखमी झाला, ही घटना आज ता, 2 नोव्हेंबर बुधवारी दुपारी दीड वाजताचे सुमारास हिंगणी नजीक देवळी पेंढरी घाटात घडली,
रूपेश मधुकर राऊत वय 30 वर्ष असे मृतकाचे तर सुनिल मोतिराम कुंभरे वय 38 वर्ष असे जखमीचे नाव आहे, दोघेही खडकी आमगाव ता, सेलू येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
सेलू तालुक्यातील खडकी आमगाव येथील रूपेश राऊत व सुनिल कुंभरे हे दोन युवक शिताफळ आणायला हिंगणी जवळील जंगलात जात होते, दरम्यान देवळी पेंढरी घाटात हिंगणा रोडवर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली, त्यात दोघेही खाली पडले, धडक देणारे वाहन अंगावरून गेल्याने रुपेश जागीच ठार झाला, तर सुनील हा रोडवर फेकल्या जाऊन जखमी झाला, रस्त्याने येणारा रोशन ठाकरे याला अपघात झाल्याचे दिसताच त्याने जखमीचे मदतीकरिता धावपळ केली, अपघाताची माहिती हिंगणा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमीला रुग्णालयात पाठविले, व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ताब्यात घेतला, पुढील तपास पोलिस करीत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!