हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचा दिव्यांग कल्याण निधी वाटप शासन निर्णयानुसार करण्यात यावा….

0

🔥सात दिवसात दिव्यांग बांधवाना निधी वाटप करा अन्यथा ठिय्या आंदोलन.

🔥राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे गटविकास अधिकारी यांना निवेदन.

हिंगणघाट -/ शासन निर्णयानुसार प्रत्येक वर्षी दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप करण्यात संबंधी निर्गमित करण्यात आला आहे परंतु प्रत्यक्षात पाहणीनुसार हिंगणघाट पंचायत समिती येणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये वाटपा संबंधी उदासीन धोरण दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल पक्षाकडे काही दिव्यांग बाधंवाच्या तक्रारी प्राप्त झाल्या, असल्यामुळे त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन हे निवेदन देण्यात येत आहे.या निवेदन दखल घेऊन येत्या सात दिवसात पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या एकूण ७० ग्रामपंचायत मधील निधी वाटप करण्यात यावा तसे न झाल्यास आपल्या कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांनी गटविकास अधिकारी यांना दिले.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर,सतिश गोळकार, जगदीश देवतळे,सचिन भजभुजे, देवराव चाफले उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान साहसिक news -24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!