हिंगणघाट येथे टोकण देत पेटी न वाटताच शिबिरातील कर्मचारी बेपत्ता ; संतप्त लाभार्थ्यांचा रस्ता रोको
इक्बाल पहेलवान / हिंगणघाट:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजने अंतर्गत कामगाराला सेफ्टी किट अर्थात पेटी दिली जाते . हिंगणघाट येथे कलोडे हॉल येथे पेटी वाटप कॅम्प आयोजित करण्यात आला . हिंगणघाट येथील पेटी वाटप कॅम्प मधील कर्मचाऱ्यांनी कामगारांना टोकन नंबर देऊन रविवारी सकाळी चार वाजता रांगेत उभे राहायला सांगितले . त्याप्रमाणे कामगार पहाटे चार वाजेपासून रांगेत उभे होते काही बाहेर गावाकडील कामगार गाड्या करून रात्रीपासून कॅम्प जवळ येऊन होते .पहाटे सात वाजता सूत्रानुसार माहिती मिळते पेटी वाटप कॅम्पचे सर्व कर्मचारी रात्री दोन वाजता अचानक पणे सुचना न देता फरार झाले व कामगारांची पिळवणूक केली त्यामुळे कामगार संतापले व संविधान चौक जवळील नॅशनल हायवे ७ वरती सर्व कामगारांनी धाव घेतली व काहीवेळा करिता नॅशनल हायवे ७ बंद करण्यात आला.पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले व रस्ता रोको करणाऱ्या सर्व कामगारांना ताब्यात घेऊन राष्ट्रीय महामार्ग मोकळा केला. सर्व कामगारांची प्रशासनाला व महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाला मागणी आहे की त्वरित हिंगणघाट येथे पेटी वाटप कॅम्प योग्य व्यवस्थापन करून सुरू करण्यात यावा व टोकन नंबर नुसार कामगारांना पेटी देण्यात यावी अन्यथा वर्धा येथील कामगार ऑफिस समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलेला आहे.
यासंदर्भात कामगारांची फसवणूक करणाऱ्या या विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी या फसवणूक झालेल्या कामगारांची मागणी आहे.