हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण व वृक्ष दिंडी संपन्न…,

0

आष्टी (शहीद)-/ येथील हुतात्मा राष्ट्रीय (इ. मा )शाळेत आषाढी एकादशीला विठ्ठल नामाच्या गजरात वृक्षारोपण व वृक्षदिंडी सोहळा पार पडला आषाढी एकादशी व मोहरम या पवित्र सणाच्या पर्वावर आष्टी मध्ये दिंडीच्या रूपाने हिंदू मुस्लिम एकतेचे अभूतपूर्व दर्शन आष्टीकरांना या निमित्ताने बघायला मिळाले या कार्यक्रमाला हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष भरत वनझरा सचिव  विनायक रावजी होले हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राम बालपांडे नगरपंचायत चे उपाध्यक्ष जाकीर हुसेन नगरसेवक  सुरजुसे वनविभाग कर्मचारी मुख्याध्यापिका सौ ढोले उपमुख्याध्यापिका सरोज राऊत सर्व शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शहीद वीरांचे पूजन करण्यात आले आपल्या प्रास्तविक भाषणामधून सौ ढोले मॅडम यांनी आम्ही यावर्षी 100 झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प केला आहे तो पूर्ण करू असे सांगितले वृक्षारोपण काळाची गरज यावर त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षदिंडीमध्ये विठ्ठल रखुमाईच्या वेश मध्ये कुमार नैतिक संजय भार्गव व कुमारी रुही अमित इंगळे तसेच छोटे विठ्ठल रुक्माई म्हणून कियारा आकाश सव्वा लाखे व सम्राट काळे यांनी सुंदर प्रदर्शन केले तर संस्कार चातूरकर व कुमारी श्रावणी कडू यांनी सुंदर वारकरी नृत्य सादर केले
या कार्यक्रमाला वनाधिकारी उईके सर यांचे सहकार्य लाभले असून त्यांनी आपल्या वनविभागातील वनरक्षक दिंडी सोबत पाठवले तसेच जनशक्ती संघटने कडून पालखीचे स्वागत करण्यात आले व त्यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला संत गोरोबा मंदिरासमोर भातकुलकर, खांडेकर परिवार व इतरांकडून पालखीचे पूजन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांना मिठाई देण्यात आली आष्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पवार साहेब आपल्या स्टाफ सह स्वतः दिंडी सोबत पूर्णवेळ हजर होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीनच ऊर्जा मिळाली या कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व मान्यवरांचे अध्यक्ष  भरत वनझारा मुख्याध्यापिका ढोले यांनी आभार व्यक्त केले.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!