कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या……

0

🔥मोई येथील तरुण शेतकरी जगदीश पवार वय ३५ वर्ष.

आष्टी शहीद -/ तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या मोई येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेताजवळच असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर वृत्त असे की तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर वसलेल्या मोई (तांडा) येथील रहिवासी जगदीश पालसिंग पवार वय ३५ वर्ष या तरुण शेतकऱ्याने स्वतःच्याच शेताजवळील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक ९ जानेवारी ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
या तरुण शेतकऱ्या कडे चार एकर शेती असून मागील वर्षी या शेतकऱ्याने बँकेतून कर्ज काढून शेती केली. मात्र सततची नापिकी होत असल्याने मागील वर्षीचे कर्ज तसेच अंगावर असताना यावर्षी खाजगी कर्ज काढून तुर व कापूस लावून पेरणी आटोपली. सुरुवातीला वरून राजाने अवकृपा दाखवल्याने पुन्हा दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते पुन्हा पेरणी करून पीक जोमात असताना वातावरणाच्या बदलामुळे नापिकी दिसत दिसत असताना काही प्रमाणात हाती येणारे पीकही वन्य प्राण्यांनी नष्ट केल्याने कंटाळलेल्या या तरुण जगदीश पालसिंग पवार या शेतकऱ्याने टोकाची भूमिका घेत गळफास लावून आत्महत्या केली आहे.आष्टी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह तपासणी करिता आर्वी येथे पाठवला. उपविभागीय पोलीसअधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार बबन फुसाटे उप पोलीस निरीक्षक राजेश उंदीरवाडे , विनायक घावट, बालाजी सांगळे, लिंबा पारेकर, देवेंद्र गुजर तपास करीत आहे.

नरेश भार्गव साहसिक NEWS-/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!