गिरोली येथे ८० मेंढ्या बकऱ्या मृत्युमुखी.
मृत्यूचे कारण गुलदस्त्यात, पाच लाख अंदाजे मेंढपाळाचे नुकसान
देवळी : तालुक्यातील गिरोली येथील शेतकरी प्रभाकर रामाजी थुल यांच्या शेतामध्ये मेंढ्या बसवण्याकरिता सोमवार एक जानेवारी रोजी रात्री साडेसात आठ च्या सुमारामध्ये मेंढपाळ शामराव कारंडे यांनी आपल्या मेंढ्या शेतामध्ये बसविण्या करिता आणल्या असत्या अचानक एका मागे एक ८० बकऱ्या व मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या असल्याची घटना उघडकीस आलेली आहे.शामराव कारंडे यांनी आपल्या मेंढ्या इतर शेतामधून चारून आणल्या व प्रभाकर थूल यांच्या शेतामध्ये रात्रीला बसवण्याकरिता आणल्या होत्या प्रभाकर थूल यांच्या शेतामध्ये मेंढ्या येतात पटापट मृत्यू पडू लागल्या त्यामुळे रात्रीच्या वेळेला किती बकऱ्या मरण पावल्या व कशामुळे मरण पावल्या त्यांना अंदाज घेता आला नाही सकाळी शामराव कारंडे यांनी तलाठी प्रीती चायकाटे व पोलीस पाटील स्मिता थूल यांना सांगितले असता पशुवैद्यकीय पथक मेलेल्या बकऱ्यांची तपासणी करण्याकरिता मंगळवारी सकाळी दाखल झाले. मृत्यूचे कारण शवविच्छेदन रिपोर्ट आल्यावरच नेमके कारण काय ते ठरेल मरण पावलेल्या ८०मेंढ्या बकऱ्यामध्ये यांची किंमत अंदाजे पाच लाखापर्यंत होत असल्याचे सांगण्यात आले आहेत. तहसीलदार दत्ता जाधव यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी चौकशी करिता पथक पाठवण्यात आले आहे. अहवाल प्राप्त होताच शासनाकडे पाठविण्यात येईल असे सांगण्यात आले.याप्रकरणी वायगाव पोलीस चौकी उपपोलीस निरीक्षक जगदीश हटवार हे पुढील तपास करीत आहे.
सागर झोरे साहसिक न्यूज/24देवळी