महाराष्‍ट्र-ओडि़शा राज्‍यातील कला-संस्‍कृतीमध्‍ये अनेक समानता : प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल

0

प्रतिनिधी / वर्धा :

महाराष्‍ट्र आणि ओडि़शा या दोन राज्‍यांमधील कला आणि संस्‍कृतीमध्‍ये अनेक समानता असून सांस्‍कृतिक जीवनातही साम्‍य आहे असे प्रतिपादन कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल यांनी केले.
एक भारत श्रेष्‍ठ भारत योजने अंतर्गत महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय व ओड़िशा केंद्रीय विश्‍वविद्यालय, कोरापुट यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार, 4 मार्च रोजी गालिब सभागृहात सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्‍यक्ष म्‍हणून ते बोलत होते.
विश्‍वविद्यालयाच्‍या प्रयागराज केंद्राहून संबोधित करतांना प्रो. शुक्‍ल म्‍हणाले की एक भारत श्रेष्‍ठ भारत उभय राज्‍यामधील संस्‍कृतीला प्रोत्‍साहण तसेच आदान-प्रदान करण्‍याचे सशक्‍त व्‍यासपीठ होय. अशा आयोजनातून प्रत्‍येक युवकांच्‍या मनात प्रेरणा उत्‍पन्‍न होईन आणि त्‍यांच्‍यात एकात्‍म भावना निर्माण होईल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
संम्मिश्र पद्धतीने आयोजित कार्यक्रमात हिंदी विश्‍वविद्यालय व ओडि़शा विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी महाराष्‍ट्र व ओडिशा राज्‍यातील संस्‍कृतीचे दर्शन घडविले. ओडिशाच्‍या विद्यार्थ्‍यांनी संबलपुरी, ढेमसा आणि महाराष्‍ट्राची लावणी ही नृत्‍ये सादर केली तर हिंदी विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी गोंधळ, लावणी, कोळी नृत्‍य व छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पराक्रमावर आधारित नृत्‍य सादर केले. कार्यक्रमाला प्रकुलगुरु प्रो. हनुमानप्रसाद शुक्‍ल, प्रो. कृष्‍ण कुमार सिंह, प्रो. अवधेश कुमार, डॉ. उमेश कुमार सिंह, डॉ. प्रकाश नारायण त्रिपाठी, डॉ. सुरभि विप्लव, श्री अपर्णेश शुक्‍ल यांच्‍यासह अध्‍यापक आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन एक भारत श्रेष्ठ भारतच्‍या नोडल अधिकारी डॉ. प्रियंका मिश्र, डॉ. सूर्य प्रकाश पांडे, डॉ. यशार्थ मंजुल यांनी केले. संचालन विश्‍वविद्यालयाचे विद्यार्थी गौरव चौहान व सुश्री मौसम तिवारी यांनी केले तर स्‍त्री अध्‍ययन विभागातील शोधार्थी सुश्री प्रीति नेगी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!