राजमाता क्रिडा मंडळ, सेलडोह येथे भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न..
🔥मातीतील खेळ जोपासने राष्ट्रीय कर्तव्य – अभ्युदय दादा मेघे🔥इतिहासातील योध्यांचा आवडता छंद म्हणजेच कबड्डी खेळ – तुषार देवढे
सिंदी (रेल्वे) : सेलडोह येथे १२ जानेवारी शुक्रवारला सायं. ६.०० वाजता राजमाता, राष्ट्रमाता माँ. साहेब जिजाऊचे औचित्य साधुन मंडळाचे अध्यक्ष कान्हा धोंगडे यांचे नेतृत्वात ६० किलो वजन गटाचे भव्य कबड्डी सामने आयोजित करण्यांत आले. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २५ नामांकित चमुने भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात होवुन गावकरी मंडळी व मान्यवर उपस्थित होते.
चार दिवशीय स्पर्धेत प्रथम पुरस्कार रू. २१,०००/- मित्र परिवार, केळझर या टिमला उदयदादा मेधे, अध्यक्ष युवा सोशल फोरम व दत्ताजी मेघे फाऊण्डेशन, सावंगी (मेघे) यांचेतर्फे देण्यांत आला. द्वितीय पुरस्कार रू. १५,०००/- जय बजरंग क्रिडा मंडळ, सुरगांव यांना जयंत तिजारे प्रहार जिल्हा प्रमुख, कान्हा धोंगडे राजमाता क्रिडा मंडळ अध्यक्ष, सचिन राऊत यांच्यातर्फे देण्यांत आला. तृतीय पुरस्कार रु. ११,०००/- राजमाता क्रिडा मंडळ, सेलडोह यांना तुषार देवढे कट्टर शिवसेना समर्थक उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे देण्यांत आला. चतुर्थ पुरस्कार ५,०००/- संघर्ष स्पोटींग क्लब नागपूर यांना शार्दुल वांदीले युवा सेना यांचेतर्फे देण्यांत आला. तसेच बेस्ट रिडर, बेस्ट कैंचर तसेच बोनस बेस्ट डिफेंडर आदि पुरस्कार तसेच आकर्षक ट्रॉफी मंडळातर्फे देण्यात आल्या. बाहेरगावावरून येणाऱ्या सर्व खेळाडूंच्या निवास व जेवनाची चोख व्यवस्था लावली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयदादा मेघे, दत्ताजी मेधे फाऊण्डेशन, सावंगी (मेघे) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन तुषार देवढे, शिवसेना कट्टर समर्थक उध्दव साहेब ठाकरे, विनोद लाखे माजी जिल्हा परिषद सदस्य, जयंत तिजारे प्रहार जिल्हाप्रमुख वर्धा, अमर गुंदी शिवसेना तालुका प्रमुख सेलू, मोहित पवनारकर पदाधिकारी टायगर ग्रुप सेलु तालुकाअध्यक्ष, रिना तिवारी सरपंच सेलडोह, माजी सरपंच ताराचंद सोनटक्के, रणजीत ईवनाथे ग्रा.पं. सदस्य नालवाडी, मुकूंदा खोडे कान्हा धोंगडे मंडळ अध्यक्ष, शार्दुल वादीले, शामलता गहरोले ग्रा.पं. सदस्य सेलडोह, दिनेश घोडमारेपत्रकार सिंदी रेल्वे, राहुल लाडीस्कर, शंकर तेलरांधे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना उदयदादा मेघे म्हणाले की, शेतकरी, मजुर, ग्रामीण भागातून आलेला कबड्डी हा खेळ राष्ट्राची ओळख आहे. या खेळातुन युवक, बलशाही होवुन देशव्यापी स्तरावर नावलौकीक पावलेला आहे. ग्रामीण भागाची ओळख म्हणुन कबड्डी हा खेळ आजही चमक-धमक न वापरता लाल मातीमध्ये युवक खेळत आहे. या खेळाला राष्ट्रीय स्तरावरून मोठी मदत होवुन आज प्रो कबड्डी सारख्या संस्थांनी राजाश्रय देवुन ग्रामीण भागातील खेळाडूला एक चेहरा प्राप्त झालेला आहे. म्हणुन आज मातीतील हा खेळ जोपासने नागरीकांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.
आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये समाज सेवक तुषार देवढे म्हणाले की, गुरू द्रोणाचार्य व्यायामशाळेच्या माध्यमातून सण २००८ च्या पुर्वी १५ वर्षापासुन या कबड्डी खेळाच्या स्पर्धा बंद झाल्या होत्या. त्या आम्ही आपल्या संस्थेच्या मार्फत सुरू करून सतत ७ वेळा विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा, राष्ट्रीय मलखांब स्पर्धा भरविल्या. या अशा मातीतील खेळाला लोक प्रतिनिधींनी किंवा व्यावसायिकांनी राजाश्रय द्यावा व या कबड्डी खेळातील खेळाडूंना गाव पातळीवर वाव देवून कबड्डीला जिवंत ठेवावे. पुर्वी महाभारतात या खेळाला चक्रव्युव असे म्हणत, नंतर या खेळाला हुतूतू म्हणण्यांत आले. आज याच खेळाला कबड्डी असे संबोधतात. गुरू द्रोणाचार्य या महाभारतातील गुरूंच्या ६४ कलामधून ६३ वी कला कबड्डी, यामध्ये द्वंद, रनिंग कुस्ती हे युध्द कलेचे सर्व प्रकार सामील होते. शरण या मरण हाच शेवटचा निर्णय, कालांतराने या खेळात बदल होवुन नियम ठरविण्यांत आले व हा कबड्डी खेळ ग्रामीण भागात प्रसार पावुन स्पर्धा निर्माण झाल्या, असे विस्तृत कबड्डीचे वर्णन समाज सेवक तुषार देवढे यांनी केले व उपस्थितांना माहिती दिली व आदि मान्यवरांनी उपरोक्त स्पर्धेला शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. आनंदपाल अंबरते महाराज यांचा सप्तखंजरी कार्यक्रम, समाज प्रबोधनपर सादर करण्यांत आला. प्रेक्षकांनी प्रचंड दाद दिली. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता छत्रपती तिमांडे, हेमराज खोडे, सुनिल सोनटक्के, प्रशांत तळवेकर, राजु लाडीस्कर, अजय गहरोले, मनोज सावरकर, राजु हटवार, आकाश जाधव, प्रतिक सोनटक्के, साहील दुधनकर, अक्षय जाधव, राकेश ठाकरे, हिमांशु दुधनकर, अनिकेत मडावी, कुणाल राऊत, मनिष वाघाडे, आदित्य राऊत, आदित्य झाडे, रूपेश मेश्राम, तुषार कुसराम, भाविक सोनटक्के, सागर लाडीस्कर, सुरज झाडे, शुभम अमनेरकर, अंशु कोहळे, कार्तिक वरठी, शशांक लाडीस्कर, गौरव दोडके, वेदांत डोने ,संदेश नागोसे, सुरज हरभरे, सचिन राऊत, लक्ष्मण सोनटक्के, रमेश सावरकर, पियुष दांडेकर, अभिलाष बोरले, सागर ईरपाते, माणिकभाऊ देढे, विनोद मेश्राम, सौरभ मेश्राम, रोहन सावरकर, सचिन कोल्हे, सचिन लांजेवार, उदय सावरकर, आकाश वाघाडे, स्वप्निल ईरपाते, राजेंद्र नेहारे, नागोभाऊ वरठी, आयुष वलके, स्वप्निल मोरे, हर्ष अंबलकर, गौरव धोंगडे, पुष्पराज मेश्राम, संकेत देशमुख अदि संपर्ण राजमाता क्रीडा मंडळ सदस्य आणि सेलडोह येथील शिवसैनिक यांनी अथक परिश्रम घेवुन स्पर्धेला यशस्वी केले.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24 सिंदी रेल्वे