रेशनिंगच्या तांदळाचा काळाबाजार करतांना दोघांना अटक

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
रेशन दुकानात वापरण्यात येणारा शासकीय तांदुळ विना परवाना गोदामातून वाहतुक करीत असतांना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे . ही कार्यवाही कोल्ही शिवारात पोलिसांनी केली . यात श्रीकांत प्रभाकर शिंगरू वय ४८ रा हिंगणघाट व अंकित धमेंद्र कराडे वय २६ रा वाघदरा ता .वणी जि. यवतमाळ असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत या गंभीर प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे .
कोल्ही शिवारातील गोदामातून शासकीय तांदळाचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांना प्राप्त होताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजय अवचट व त्याचे पथकाला पेट्रोलिंग वर पाठविले. पोलीसांनी तात्काळ कोल्ही शिवार गाठून वामण भाईमारे यांच्या शेतातील गोदामात छापा मारला असता त्यांना मालवाहु वाहन क्र एम.एच.३४ बीजी १३४५ गोदाम परिसरात उभा दिसला पोलिसांना चालकास ताब्यात घेत मालवाहुची पाहणी केली असता त्यात रेशनच्या तांदळाचे १४६ कट्टे आढळून आले पोलिसांनी चालक व क्लिनरला परवाण्याची विचरणा केली असता चालकाने कुठलाही परवाना नसल्याच सांगितले . दरम्यान रेशन दुकानातील तांदळाचा काळाबाजार करीत असल्याचे उजेडात येताच पोलिसांनी दोघानाही अटक केली . त्याच्या कडुन मालवाहु वाहनासह तांदळाचे मुद्दे माल जप्त करीत गुन्हा दाखल केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!