वानाडोंगरीचा विकास कामाच्या भ्रष्टाचाराचा पाडाव…?

0

🔥हेच ते वानाडोंगरी नगर परिषद  भ्रष्टाचार,ढिसाळ व विकासकामे आणि जनतेची पाण्यासाठी वणवण – लोकशाहीची करतात चेष्टा…!

हिंगणा -/ विधानसभा क्षेत्रातील आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नांतून वानाडोंगरी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेतील रूपांतर झाले, विकासासाठी कोट्यवधींचा निधी मिळवण्यात आला – हे मान्य आहे. परंतु त्या निधीचा वापर अत्यंत सुमार दर्जाच्या,अनियमित व भ्रष्ट विकासकामांमध्ये झाला आहे.नगर परिषदेकडून रस्ते,सिमेंट रोड,नाल्या, समाजभवन,प्रवासी निवारे इत्यादी कामे करण्यात आली.मात्र,ही कामे कागदावर असली तरी प्रत्यक्षात ठेकेदार झालेल्या नगरसेवकांनीच ती कामे करत भ्रष्टाचाराचा अड्डा तयार केला आहे.एक-दोन वर्षातच सिमेंट रोडला भेगा, ग्रीनजिमची दुर्दशा आणि प्रवासी निवारे ओस आहेत.

🔥पावसाळ्यात पाइपलाइन खोदकाम सुरू – शहरात चिखलाचे साम्राज्य.

नवीन १३४ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस अद्याप निधी मिळालेला नसताना, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावसातच नाल्या फोडून पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. परिणामी वानाडोंगरी शहर चिखलमय झाले असून,अपघातांचे प्रमाण वाढले आहे.            🔥उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण – भ्रष्टाचाराचा कहर..!

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात वानाडोंगरीत पाण्याची तीव्र टंचाई असते. लाखो रुपये खर्चूनही नागरिकांना पाण्याचा थेंब मिळत नाही.पाणीटँकर वाटपात दरवर्षी गैरव्यवहार होत असून, काही ठिकाणी टँकरवाले पैसे मागतात. प्रशासन केवळ कागदावर असून माजी नगरसेवकांच्या सांगण्यावरच पाणी दिले जाते.

🔥विरोधकांनी केले आंदोलन – पण उत्तर मिळाले नाही

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात एक वर्षापूर्वी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अनेक नेत्यांनी समर्थन दिले. मात्र आंदोलन थांबवण्यात आले की थांबवले गेले, यावर आजही चर्चा सुरू आहे.

🔥जनसंघर्ष समितीचा इशारा – कोर्टात जाणार..!

जनसंघर्ष सामाजिक समितीचे अध्यक्ष सुधीर मस्के यांनी माहिती दिली की, मागील पाच वर्षात लाखो रुपयांचे भ्रष्ट व्यवहार झाले आहेत. शासनाकडे पुराव्यानिशी तक्रारी देऊनही सत्ता सर्वत्र भाजपची असल्याने कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. आता न्यायालयात याचिका दाखल करून लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(🔥प्रतिक्रिया,आमची स्पष्ट मागणी आहे की:

नगर परिषदेत झालेल्या सर्व विकासकामांची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करण्यात यावी.

दोषी नगरसेवक व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

पाणीटँकर वाटपात पारदर्शकता यावी व टँकर वाटप यादी प्रसिद्ध करावी.

सांडपाणी व कचऱ्याच्या व्यवस्थापनात त्वरित सुधारणा करण्यात यावी.)

गजानन ढाकुळकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!