🔥गांधी सिटी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा तर्फे वृक्षारोपण व सामाजिक कार्यक्रम.
वर्धा -/ बोरगांव मेघे येथील गांधी सिटी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वर्धा तर्फे प्रार्थना मंदिर बोरगांव मेघे येथे वृक्षारोपण तसेच श्री छाया बाल गृह नालवाडी वर्धा येथील अनाथ मुलांना भोजनदान करण्यात आले या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा सुनीता विं मेघे उपाध्यक्ष्या वंदना र. सायंकार सचिव शुभांगी स. पाटील तसेच संचालिका रेखा अ. कडू, नीलिमा प्र. येलचटवार , संगीता दि. तडस, दीपा दा. सेलुकार, अरुणा सु. ऐवतकर, सुजाता सु. मोरे, माधुरी मु. गायकवाड, तारा सु. सोनुले, योगिता रा. देशमुख, उषा ना. बोटकुले, ज्योती अ. देशमुख तसेच संस्थेचे व्यवस्थापक वासुदेव तेलरांधे, कर्मचारी पंकज मोहदुरे, नम्रता सेगोकर तसेच संस्थेचे अभिकर्ते राजू सायांकर, वसंता तालन लता राऊत, निलेश माटे इ. उपस्थित होते.