मां मुख्यमंत्री यानी निवडणुकीत,दिलेल्या आश्वासनाची त्वरित पुर्तता करावी…..
🔥मां मुख्यमंत्री यानी निवडणुकीत,दिलेल्या आश्वासनाची त्वरित पुर्तता करावी.
पुलगाव,वर्धा -/ दि.१६,जुलै,२०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्यावतीने विद्यमान सरकार ने विधानसभा निवडणूकीत २०२४ मध्ये आपल्या पक्षाचे सरकार स्थापन व्हावे म्हणून, आपल्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेला दिलेले आश्वासन व त्या आश्वासनाला आश्वासित राहून महाराष्ट्रातील जनतेने आपणास भरघोश मतांनी आशीर्वाद देऊन मतदान करून ,आपल्या पक्षाचे सरकार स्थापन झाले म्हणून आपण आपल्या पक्षाच्या घोषणा पत्रामध्ये महाराष्ट्रातील जनतेला दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात यावी.
1)शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी
२)वृद्ध पेन्शन धारकांना महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये देऊन त्यांचा सन्मान करवा.
3)लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये देऊन त्यांचा सन्मान करवा.
4)महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड दर तीन वर्षांनी होणारी पूनर नोंदणी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी माननीय आमदार महादेव जानकर यांनी दिनांक 28 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशनामध्ये लावलेल्या लक्षवेधीला मा. देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी विधानपरिषदेत दीलेल्या उत्तराची, तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, व शासनादेश तात्काळ काढण्यात यावा.
5)महाराष्ट्रातील होमगार्ड ला 365 दिवस काम देण्यात यावे.
6)माननीय श्री प्रकाश जावडेकर माजी केंद्रीय मंत्री यांनी ई पी एस 95 च्या पेन्शनरला पेन्शन व महागाई,भत्ता वाढ देण्याबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात यावी.
कमीत कमी मासिक पेन्शन 9000 रुपये व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा.
या मागण्या करिता दि.०२ जुलै २०२५ रोजी निवासी जिल्हाधिकारी गणेश खताळे यांना निवेदन देण्यात आले होते पण शासनाने अद्याप पर्यंत कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाही म्हणून आज दि.१६ जुलै रोजी स्मरण पत्र देऊन मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.त्यावेळी
संदीप कीटे युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष,प्रवीण पेठे सैनिक सेल प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्या उपस्थितीत नामदेव खानझोडे विधानसभा उपाध्यक्ष यांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेश फुळझाले यांना निवेदन दिले .
यावेळी संदीप भांडवलकर जिल्हा उपाध्यक्ष,प्रणव कदम राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष, संदीप गीते, सुनील आसटकर, प्रशांत मेटे,विलास बेलामकर, चंद्रकांत मोरे,प्रवीण खोबरागडे,वाशिम शेख ,हे उपस्थित होते.
सागर झोरे साहसिक News-/24 पुलगाव,वर्धा