“अरुणोदय अभियान” अंतर्गत महाराष्ट्रात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू!०ते ४० वयोगटातील नागरिकांची रक्तनमुना तपासणी… रुग्ण-वाहकांचा शोध घेऊन उपचार सुरू होणार!
🔥“अरुणोदय अभियान” अंतर्गत महाराष्ट्रात सिकलसेल तपासणी मोहीम सुरू!🔥०ते ४० वयोगटातील नागरिकांची रक्तनमुना तपासणी… रुग्ण-वाहकांचा शोध घेऊन उपचार सुरू होणार!
हिंगणा -/ महाराष्ट्रात सिकलसेल ऍनिमियाने ग्रस्त रुग्ण व वाहकांचा शोध घेऊन त्यांना पूर्ण उपचाराखाली आणण्यासाठी “अरुणोदय – सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ० ते ४० वर्ष वयोगटातील सर्व नागरिकांची सिकलसेल संदर्भात प्राथमिक तपासणी तसेच निदान निश्चितीसाठी रक्तनमुना चाचणी केली जाणार आहे.
या मोहिमेत आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून समाजातील सिकलसेल रुग्ण व वाहकांची यादी तयार करतील. यासोबतच ज्या नागरिकांची याआधी तपासणी झाली नाही, त्यांची तपासणीही केली जाणार असून आढळलेल्या रुग्णांना आवश्यक औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ही मोहीम दि. ७ फेब्रुवारी २०२६पर्यंत सुरू असून, सर्व नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांनी केले आहे.दरम्यान, या अभियानासाठी तालुका स्तरावर सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच गटविकास अधिकारी श्री. संदीप गोडशलवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समितीची बैठक घेऊन विविध विभागांचे अधिकारी, जनप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांना अभियानाची माहिती देण्यात आली आहे. अधिक माहिती व जनजागृतीसाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा आरोग्य वर्धिनी केंद्र/उपकेंद्राशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.